file photo 
नांदेड

शौर्यदिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शौर्यदिनाचे औचित्य साधून शासनाच्या “मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना” प्रमाणपत्र वाटप शुभारंभ येत्या 29 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते होणार आहे. कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या  प्रादूर्भावअंतर्गत शासनाच्या नियमांचे पालन करत अत्यंत साधेपणाने हा शौर्यदिन साजरा करण्यात येणार आहे. 

मालमत्ता कर माफी प्रमाणपत्रासाठीचे अर्ज  सैनिक कल्याण कार्यालयात स्विकारण्यात येत आहेत. माजी सैनिकांनी अर्जांसोबत चालू वर्षे 2020 ची मालमत्ता कर पावती व ओळखपत्र छायांकित प्रत जोडून अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत फक्त एकच मालमत्तासाठी  माजी सैनिक किंवा पत्नीच्या नावावर असलेली प्रोपर्टीसाठी प्रमाणपत्र अदा करण्यात येईल. माजी सैनिकांनी प्रमाणपत्रासाठी गर्दी व घाई करु नये. अर्ज पोस्टाने किंवा तालूका संघटनेतर्फे एकत्रित आणून दिले, तरीही प्रमाणपत्र माजी सैनिकांना पाठविण्यात येतील असेही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता

जिल्हयातील वीरनारी, वीरपिता, वीरमाता आणि माजी सैनिकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या माजी सैनिक संघटना अध्यक्ष यांचा सत्कार यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केला आहे 

 भारतीय सैन्याची ही अभिमानस्पद कामगिरी

भारतीय सैन्य दलाने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्वीत घुसून सर्जीकल स्ट्राईकव्दारे अतिरेक्यांचा खात्मा केला.  जम्मु कश्मीर  उरी येथे  झालेल्या अतिरेक्याचा भ्याड हल्ल्याचा  बदला घेण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आली होती.  भारतीय सैन्याची ही अभिमानस्पद कामगिरी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी शौर्यदिन साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT