file photo 
नांदेड

कर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्जाला मुदतवाढ  

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगाम सन २०२० - २०२१ साठी ऑनलाईन पीक कर्ज नोंदणी शनिवार ता. सहा जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पीक कर्ज घेण्यास इच्छूक शेतकऱ्यांनी नमूद संकेतस्थळावर पीक कर्ज मागणीची नोंदणी करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे.

संसर्ग टाळावा यासाठी प्रयत्न 
कोरोना (कोवीड-१९) विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळावा व बँकेच्या सेवा अधिक सुरक्षीत व्हाव्यात यासाठी सन २०२० - २०२१ या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील पीक कर्ज घेण्यास इच्छूक शेतकऱ्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSehk6tQ6VGKaSH_LSQ6o4u2S7dNATKcjwOK2mKLfD8qD7He0g/viewform?usp=sf_link   या संकेतस्थळावर ऑनलाईन पीक कर्ज मागणी नोंदणी ता. १७ मे ते ता. २७ मे दरम्यान करण्याबाबत मुदत दिली होती. 

हेही वाचा....

एक लाख सत्तर हजार अर्ज 
दहा दिवसाच्या कालावधी दरम्यान जिल्ह्यात एक लाख ७० हजार २४० शेतकऱ्यांनी ऑनलाईन संकेतस्थळावर पीक कर्ज मागणी नोंदविली आहे. पीक कर्ज मागणी नोंदणी याद्या व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँकेमार्फत संबंधीत बँक शाखेस पाठविण्यात आल्या आहेत. खरीप पीक कर्ज हंगामात नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये म्हणून पीक कर्ज मागणी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शनिवार ता. सहा जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.  

हेही वाचलेच पाहिजे.....

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना आवाहन
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. बँकांतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी २०२० - २१ या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील पीककर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर (ता. १७ ते २७) मे दरम्यान ऑनलाइन पीककर्ज मागणी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शेतकऱ्यांना केले होते. 

शिल्लक शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ
शेतकऱ्यांना कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने बॅंकांना पात्र खातेदारांना कर्ज वितरित करावे लागेल. यात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत संबंधित बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. ही यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पीककर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. यामुळे यापुढेही शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT