crime news 
नांदेड

फेसबुक मैत्री पडली महागात; अमेरिकन भामट्याकडून फसवणूक

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चित्ररेखा इंगळे यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली. त्यावरून मांडवी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक दुर्गादास मल्हारी पुढील तपास करत आहेत.

प्रमोद चौधरी

नांदेड ः उमरा बाजार (ता. किनवट) येथील चित्ररेखा हरीदास इंगळे (वय ४६) यांच्यासोबत मांडवी ते सारखणी येथे दोन (Facebook friend) आरोपींनी संगणमत करून फेसबुकवर मैत्री केली. दरम्यान सदर महिलेच्या वाढदिवसानिमित्त या आरोपींनी अमेरिकेतून ५० हजार रुपये पाऊंडचे पार्सल पाठविले. सदर पार्सल सोडविण्यासाठी टॅक्स स्वरूपात महिलेने आपल्या सारखणी येथील एसबीआय बॅंकेतील (Sbi Sarkhani kinwat) रक्कम चार लाख २६ हजार आरोपींच्या खात्यावर पाठवले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चित्ररेखा इंगळे यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली. त्यावरून मांडवी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक दुर्गादास मल्हारी पुढील तपास करत आहेत. (Facebook- friendship- fell- expensive- Fraud- from -an American- villain)

ज्ञानेश्वर नगरात दुचाकीची चोरी

नांदेड ः गोविंद रुखमाजी पावडे (रा. ज्ञानेश्वर नगर पूर्णा रोड) यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची दुचाकी (एमएच-२६, वाय-४८७९) ज्ञानेश्वरनगर येथून चोरीला गेली आहे. गोविंद पावडे यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला आहे.

सिडकोत जुन्या पोत्यांची चोरी

नांदेड ः सिडको एमआयडीसीमध्ये मोहन जयराम भानुशाली (रा. बंदाघाट) यांचे भद्रा ट्रेडींग कंपनी आहे. २१ मे रोजी नेहमीप्रमाणे ते दिवसभर काम करून सायंकाळी गोडावूनला कुलुप लावून घरी गेले. त्यानंतर आरोपींनी शटरचे कुलुप काढून आतील ३५ हजार रुपये किंमतीचे २५ जुन्या पोत्यांचे बंडल चोरून नेले. दुसऱ्यादिवशी सकाळी मोहन भानुशाली कंपनीत आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच पोलिसांमध्ये तक्रार दिली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - धमकीच्या मेलमध्ये दरमहा पाच कोटी रुपये सुरक्षा कर देण्यासाठी संदेश लिहिलेला होता. हॉटस्पॉटची क्षमता एक किलोमीटर लिहिलेली होती. १० कोटी रुपये आणि दरमहा पाच कोटी रुपये सुरक्षा कर येत राहील तोपर्यंत सर्वकाही गुप्त राहील असेही संदेशात आरोपीने म्हटलेले आहे

सोन्याचे दुकान टाकण्यासाठी विवाहितेचा छळ

नांदेड ः सोन्याचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून १२ लाख तसेच घर बांधण्यासाठी सहा लाख असे एकूण १८ लाख रुपये आण, असे म्हणत आखाडा बाळापूर (ता.कळमनुरा) येथे २८ वर्षीय महिलेचा छळ केला जात होता. २५ आॅक्टोबर ते १९ मे २०२१पर्यंत सासरी विवाहितेला पैशाच्या कारणासाठी उपाशी पोटी ठेवून शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. जिवे मारण्याचीही धमकी दिल्याने विवाहितेने माहेर (नांदेड) गाठून भाग्यनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्यानुसार भाग्यनगर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

दारु पिण्याच्या कारणावरून मुलाने वडिलांना ढकलल्याने मृत्यू

नांदेड ः दौलत अमृता कोल्हेकर (वय ९०, रा. पाटोदा, ता.नायगाव) यांनी मुलाला दारु पीऊ नकोस असे म्हणत त्याच्या खिशातील दारूची बाॅटल काढत होते. त्यावेळी मुलाने दौलत कोल्हेकर यांना जोराने ढकलल्यामुळे ते खाली पडले. तसेच त्यांचे डोके गॅस सिलेंडरच्या टाकीवर आदळल्याने डोक्याला गंभीर जखम होवून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच मुलगाच कारणीभूत असल्याचे पोलिस उपनिरीक्षक दिनेश शिवाजीराव येवले यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे. त्यानुसार कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक श्री. पठाण तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT