file photo 
नांदेड

नदी ओलांडून जाताना पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू; अर्धापूर तालुक्यातील घटना

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी नदी ओलांडून जात असताना पाण्याचा अंदाज न लागल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( ता. 22) घडली आहे. या घटनेमुळे नदीवर पुल बांधण्याचा प्रश्न पुन्हा ऐकदा ऐरणीवर आला आहे. यापुर्वीही अशा घटनेत एका शेतकऱ्याला प्राण गमवावा लागला होता.

अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील बालाजी नामदेव बिचकुले (वय ४५  ) हे शेत कामानिमित्त दांडेगाव नदीमधून पलीकडे जात असतांना पाण्याचा अंदाज न लागल्याने बुडून मृत्यू झाला. घटना सोमवारी घडली असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची सावरगाव परिसरामध्ये साडेचार एकर शेती असून शेतकरी कुटुंबावर या मृत्यूमुळे मोठे संकट कोसळले आहे.

सावरगाव परिसरातील शेतकऱ्यांची दांडेगाव नदी पलीकडील बाजूला कोंढा आदी शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात शेती आहे. नदीवर ये- जा करण्यासाठी पूल नसल्याने येथील शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या अगोदरही एका शेतकऱ्याचा अशाच प्रकारे पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर बालाजी बिचकुले यांचा मृत्यू झाला असून या शेतकरी कुटुंबांना शासनाने मदत द्यावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
सावरगाव परिसरातील शेतकऱ्यांना शेतकामासाठी नदीपलीकडे जावे लागते आत्तापर्यंत दोन शेतकऱ्यांचा पूल नसल्याने नदीतून जाताना पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर पावसाळ्यात येथील शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सावरगाव शिवारातील शेती नदीच्या पलीकडे असल्याने नेहमी शेतकऱ्यांना त्रास होत आहे या ठिकाणी पूल करणे गरजेचे आहे यासाठी शासन व लोकप्रतिनिधींशी पाठपुरावा करण्यात येईल.
- छगन सांगोळे, अर्धापूर

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Nagpur RTO Crackdown: नागपूरमध्ये HSRP नसलेल्या वाहनांवर RTOची धडक कारवाई; तीन दिवसांत १७२ वाहनांवर ई-चलान, १.७२ लाखांचा दंड

Melghat Teachers Scam: मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत मोठा घोळ? आरटीई व संचमान्यतेला हरताळ, प्रहार संघटनेचा पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह

Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

SCROLL FOR NEXT