young farmer watermelon in Kashmir market Kalamanuri nanded sakal
नांदेड

सांडसचे टरबूज काश्मीरच्या बाजारपेठेत

तरुण शेतकऱ्याचे नियोजन; तीन महिन्यांत दोन लाखांचा नफा

संजय कापसे / सिताराम देशमुख

कळमनुरी : सांडस (ता. कळमनुरी) येथील तरुण शेतकऱ्याने एका एकरमध्ये टरबूज पिकाचे उत्पादन घेतले. तसेच विक्रीचे नियोजन केल्याने तीन महिन्यात जवळपास दोन लाख रुपयाचा नफा मिळविला आहे. सांडस येथे उत्पादित झालेले टरबुज थेट काश्मीरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पोहोचले आहेत.सांडस येथील शेतकऱ्यांनी मागील काही वर्षाचा अनुभव पाहता टरबूज पिकांमधून कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळवता येते, हे लक्षात घेतले. त्यानुसार खरीप हंगामातील शेतामधील पिकाची काढणी झाल्यानंतर पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी टरबुज पिकाची शेती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. टरबूज फळाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव पाहता परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आता टरबूज लागवड केली आहे. त्यामुळे या भागात टरबूज लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.

गावामधील शेतकरी गजानन धावंडकर, दिगंबर वाघमारे, कुंडलीक निरगुडे, चंद्रकांत होडबे, रवी वाघमारे, सुनील निरगुडे, हनुमंत होडबे, कपिल निरगुडे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी जवळपास पंधरा ते वीस एकर शेतीवर टरबुजाची लागवड केली आहे. यामधील गजानन धावंडकर या शेतकऱ्याने एक एकरवर टरबुजाची ता. पाच जानेवारीला लागवड केली. मागील अनुभव पाहता त्यांनी नियोजन करून वॉटर सोलीबल पद्धतीने खते व औषधी देऊन फळ वेलीची जोपासना केली. यासाठी त्यांना एकूण ६५ हजार रुपये खर्च आला.

टरबूज काढणीस आल्यानंतर त्यांनी ठोक भावात टरबुजाची विक्री केली त्यासाठी त्यांना दहा हजार पन्नास रुपये टन भाव मिळाला. त्यामध्ये त्यांनी १९ टन टरबूज विक्री केले. यामधून त्यांना एक लाख ९६ हजार रुपये उत्पन्न मिळाले. हे टरबूज थेट काश्मिरच्या कुलू मार्केटमध्ये विक्रीसाठी पोहोचले आहेत. शेतीमध्ये शिल्लक राहिलेल्या दोन किलो ते तीन किलो वजन असलेल्या टरबूज नगाची दहा रुपये किलोप्रमाणे विक्री त्यांनी स्थानिक बाजारपेठेत सुरू केली आहे. या मधून शिल्लक असलेल्या जवळपास पाच टन टरबुजाचे ५० हजार रुपये उत्पन्न मिळणार असल्याचे शेतकरी धावंडकर यांनी सांगितले.c

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT