Nanded News 
नांदेड

Video - नांदेडमध्ये सरसकट पिकविम्यासाठी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन 

प्रमोद चौधरी

नांदेड : खरिपात अतिवृष्टी तसेच परितीच्या पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा मिळाव्या या मागणीसाठी शेतकरी कष्टकरी संघर्ष समितीकडून सोमवारी (ता. १४) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दावे दाखल केलेल्या शेतकऱ्याशिवाय इतर नुकसानग्रस्तांना पिकविमा देण्याची मागणी करत जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी रविशंकर चलवदे यांना हजारो अर्ज सादर केले. 

नवा मोंढा भागातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी शेतकरी कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक कैलास येसगे, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, प्रा. बालाजी कोंपलवार, राजन क्षीरसागर, शुभाशीष कामेवार, हनुमंत राजेगोरे, लक्ष्मण शिंदे, गंगाधर गायकवाड यासह उपस्थित काही शेतकऱ्यांनी आंदोलनाकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. यानंतर ऑक्टोंबरमध्ये परतीच्या पावसाने झोडपून काढल्यामुळे जिल्ह्यातील साडेपाच लाख हेक्टरवरील खरिप पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील साडेनऊ लाख शेतकऱ्यांनी खरिपात पिकविमा भरला. परंतु नुकसानीबाबत विमा कंपनीने मात्र तुरळक शेतकऱ्यांना भरपाइ दिली. नुकसान सरसकट झाल्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना भरपाइ मिळण अपेक्षीत असताना विमा कंपनीच्या चुकीच्या निकषामुळे लाखो शेतकरी विम्यापासून वंचित राहिले, असा सूर उपस्थितांनी आवळला. 

यामुळे जिल्ह्यातील सादर करण्यात येत असलेल्या अर्जाची सुनावणी घेवून सर्वच शेतकऱ्यांना विमा भरपाइ देण्याची मागणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्याकडे करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी हजारो अर्जाचे गठ्ठे श्री चलवदे यांना सादर करुन नुकसानीचे प्रमाण अधीक असल्यामुळे पिककापणी प्रयोगाची वाट न पाहता शेतकऱ्यांना भरपाइ देण्याची मागणी केली.

भरपाई मिळावी हीच आमची भूमिका आहे
पिकविमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या अर्जाची माहिती पाठविली कृषी विभागाकडून कंपनीकडे कळविण्यात येइल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाइ मिळावी, अशी आमची भुमीका आहे. 
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT