nanded sakal
नांदेड

वेदनेला अंत नाही, याची कुणालाही खंत नाही...

कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे जागरण ; निसर्गापाठोपाठ महावितरणही उठले जिवावर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जगाचा पोशिंदा शेतकरी(farmer) हे विधान सत्य असले तरी, राजकारण्यांसाठी हे ब्रीद केवळ कांगावा करून मत जिंकण्याचे माध्यम ठरले आहे. शेतात असलेल्या कोवळ्या पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांना आता अंधार यातना भोगाव्या लागत आहेत. दिवसभर शेतात राबायचे आणि रात्रभर ओलितासाठी जागायचे, असे धोरण महावितरणने हाती घेतल्याचे दिसून येत आहे. या गंभीर प्रकारामुळे शेतकऱ्यांना वेदना सहन कराव्या लागत आहेत. सध्या थंडीचा जोर वाढत चालला असून शेतशिवारामध्ये रब्बी पिकांना(rabbi crops) ओलिताचे काम सुरु आहे. दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला मात्र दिवसा वीज मिळत नसल्याने रात्री जागरण करत पिकांना पाणी द्यावे लागत आहे. निसर्गापाठोपाठ महावितरणही(mscb) जीवावर उठले असून शेतकऱ्यांनीच रात्रभर का जागावे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकीकडे निसर्गाच्या असमतोलामुळे सततच्या नापिकीने आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने शेती आणि शेतकरी यांच्याबाबत घेतलेले धोरण, काही निर्णय हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहेत. नांदेड जिल्ह्यात महावितरणकडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी आठवड्यात चार दिवस दिवसाला तर तीन दिवस रात्री असा आठ तास वीजपुरवठा केला जातो. त्यातच दिवसा होणाऱ्या वीजपुरवठा तांत्रिक दुरुस्तीच्या नावाखाली तासनतास खंडित असतो. रात्री ओलितासाठी शेतात जाताना शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन ओलित करावे लागते. शेतशिवारात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो. हे वन्यजीव कधी शेतकऱ्यांवर हल्ला करतील याचा नेम नाही, अशी भयावह परिस्थिती आहे.

शेतामध्ये वीज केव्हाही जाते आणि केव्हाही येते. अघोषित भारनियमनामुळे शेतकरी वैतागले आहेत. शेतीसाठी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार वीजपुरवठा सुरु असतो. मात्र, या वेळापत्रकातही कधी वीज गुल होईल आणि कधी येईल याचा भरवसा नाही. मुबलक जलसाठा उपलब्ध असतानाही केवळ विजेअभावी रब्बीच्या पिकांना पाणी मिळत नाही. परिणामी गहू, ज्वारी, हरभरा, हिवाळी मका आदी पिके धोक्यात आली आहेत. महावितरणने चोवीस तास वीज द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकरी(farmer) दिवसभर राबत असताना पिकाच्या सिंचनासाठी आता रात्रभर जागण्याची वेळ जगाच्या पोशिंद्यावर आली आहे. महावितरण(mscb)कंपनी वारंवार शेतकरी विरोधी धोरण अवलंबित असून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहे. जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या मंत्र्यांनी तसेच आमदारांनी याकडे लक्ष देऊन कृषिपंपांना(agro pump) सातही दिवस दिवसा वीज पुरवठा करावा. असे केले तरच शेतातील पिके जगतील आणि शेतकरी जगेल.

- विश्वनाथ सूर्यवंशी, शेतकरी, तळणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT