Farmers sell directly to consumers Response Agriculture Department 
नांदेड

नांदेड : ‘विकेल ते पिकेल’ योजनेला प्रतिसाद; शेतकरी ते थेट ग्राहक विक्री

कृषी विभागाच्या धान्य महोत्सवास तसेच ‘विकेल ते पिकेल’ या योजनेला शेतकरी व ग्राहक यांचा उस्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात कृषी विभागाच्या धान्य महोत्सवास तसेच ‘विकेल ते पिकेल’ या योजनेला शेतकरी व ग्राहक यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नांदेड शहरातील ग्राहकांनी तसेच विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर गहु, ज्वारी, तांदुळ, डाळी व इतर शेतमाल थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केला. ग्राहकांचा प्रतिसाद पाहता महोत्सव बुधवारपर्यत (ता. २३) सुरू ठेवण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत.

‘विकेल ते पिकेल’ या अभियानातर्गंत येथील जिल्हाधिकारी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या धान्य महोत्सवात शेतीपुरक उद्योगातून बचतगट आणि स्वव्यवसायातून महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्येक स्टॉलला सोमवारी भेट देवून महिलांना प्रोत्साहन दिले. सोमवारी (ता. २१) एका दिवसात जवळपास ११० शेतकरी व शेतकरी गट यांच्यामार्फत सुमारे अकरा लाख रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली आहे. तसेच जवळपास पाच लाखांच्या शेतमालाची अ‍ॅडव्हान्स बुकींग झाली आहे. नैसर्गिक शेतीमधील गावरान लसुण, सेंद्रिय गुळ, धर्माबादची टाळकी ज्वारी, लोहा तालुक्यातील लोकवन गहू, देगलूरचे लाकडी घाण्याचे करडई तेल, कामठा (ता. अर्धापूर) येथील सेंद्रीय टरबुज याला मागणी होती.

गोपाल चावडी येथील बालाजी महिला बचत गट व कांताबाई संग्राम इंगळे या महिला शेतकऱ्यांनी जात्यावर तयार केलेली मुगडाळ, उडीद डाळ, हिरवे मुग हे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. पुर्णत: नैसर्गिक पध्दतीने केलेली ही डाळ व इतर उत्पादने मागील पाच वर्षापासून विक्री करत आहेत. बोरगाव येथील भाग्यश्री महिला बचत गटातील संगीता कंदारे यांनी अगरबत्ती व्यवसाय गेल्या एक वर्षापासून सुरू केला आहे. या बचतगटामध्ये काम करण्यासाठी महिलांची संख्या मोठी आहे. अगरबत्तीसाठी लागणारा कच्चामाल हे बचत गट नागपूर येथुन आणतात.

माधवनगर पूर्णा रोड येथील सविता पावडे या मागील पाच वर्षापासून नैसर्गिक शेती करतात. पाच एकर शेतामध्ये विविध प्रकारचे भाजीपाला विक्रीसह चिकू, मोसबी, पेरू या फळाचे उत्पादन त्या घेतात. त्यांनी एक एकरमध्ये कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता काळा गहु पिकविला आहे. काळा गहू मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. या गव्हामध्ये व्हिटॅमिन, खनिज, प्रोटीन व फायबरयुक्त असून शरीरासाठी उत्तम आहे. शरीरात ॲटीऑक्सीडेंटची मात्रा वाढविण्यास प्रभावी आहे. सामान्य गव्हापेक्षा अधिक पोषक तत्वे यामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT