cash.jpg 
नांदेड

Good News : दुष्काळी अनुदानाचे १ कोटी १७ लाख जमा

सकाळ वृत्तसेवा

धर्माबाद, (जि. नांदेड) : धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी, शेळगाव (थडी), येल्लापूर, जुन्नी, पांगरीसह काही गावांतील एक-दोन शेतकरी ओल्या दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित होते. दरम्यान, पेरणीपूर्व शासनाने उपरोक्त गावच्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार दत्तात्रय शिंदे व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. 


खासदार चिखलीकर यांची मागणी
सदरील मागणीची दखल खासदार चिखलीकर यांनी घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे धर्माबाद तालुक्यातील रत्नाळीसह सात गावांतील अठराशे शेतकऱ्यांचे थकीत अनुदान १ कोटी १७ लाख रुपये जमा झाले असून सदरील अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचे तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले आहे.


अनुदानाची रक्कम शासनाकडून जाहीर
गेल्या खरीप हंगामात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. सदरील पिकांची पाहणी करून संबंधित यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करीत शासनाकडे सादर केले. त्यावेळी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये अनुदानाची रक्कम शासनाकडून जाहीर करण्यात आली. त्यानुसार बाधित क्षेत्रातील तालुक्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ५६ कोटी ९७ लाख ११ हजार ८०८ रुपये वाटप करण्यात आले. 


थकीत अनुदान जमा
परंतु तालुक्यातील रत्नाळी, शेलगाव थडी, येल्लापूर, जुन्नी, पांगरी, बाचेगाव, बन्नाळी, आलूर या गावांतील १४५६.४८ बाधित क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बाधित क्षेत्राची अर्थसाहाय्य रक्कम १ कोटी १७ लाख २० हजार ९२० रुपये असून ते अनुदान पात्र आहे. ही अनुदानाची रक्कम शासनाकडून प्राप्त न झाल्याने धर्माबाद तालुक्यातील उर्वरित १ हजार ८०० शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित होते. सदरील मागणीची दखल अखेर खासदार चिखलीकर यांनी घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे थकीत अनुदान जमा झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT