नराधम बापाला पोलिस कोठडी 
नांदेड

पोटच्या बालिकेवर अत्याचार करणारा बाप पोलिस कोठडीत

या दाम्पत्याला चार मुली असून त्यापैकी एकीचे लग्न झालेले आहे. एक मामाकडे राहते आणि एक आजी-आजोबाकडे राहते. सगळ्यात शेवटची नऊ वर्षाची बालिका आई- वडिलांसोबत नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : आपल्या नऊ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला येथील विशेष न्यायाधीश एस. एस. खरात यांनी दोन दिवस म्हणजेच ता. १८ जूनपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, ता. १६ जूनच्या पहाटे तीन वाजेच्या सुमारास आपल्या घरात नऊ वर्षाच्या बालिकेच्या ओरडण्याचा आवाज गाढ झोपच असलेल्या आईच्या कानी आला. ती खडबडून जागे झाली. ओरडणाऱ्या बालिकेला जवळ घेऊन घडलेला प्रकाराची माहिती घेतली. यावेळी रडत त्या बालिकेने घडलेला प्रकार सांगितल्याने आईलाही धक्का बसला. यानंतर तिने आपल्या पतीला विचारले की, आपल्या मुलीसोबत असे का केले. यावेळी त्यावेळी त्याने ही मुलगी माझी नाही. यावरुन दोघांत वाद झाला.

हेही वाचा - चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

या दाम्पत्याला चार मुली असून त्यापैकी एकीचे लग्न झालेले आहे. एक मामाकडे राहते आणि एक आजी-आजोबाकडे राहते. सगळ्यात शेवटची नऊ वर्षाची बालिका आई- वडिलांसोबत नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. पिडीत बालिकेला सोबत घेऊन तिची आई सकाळीच वजिराबाद पोलिस ठाण्यात आली. परंतु घडलेली घटना ही नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पिडीत बालिकेसह तिच्या आईला पोलिस गाडीतून ग्रामिण पोलिस ठाण्यात पाठविले. तेथे सर्व हकिकत ऐकून घेतल्यानंतर नराधम बापाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

नांदेड ग्रामिण पोलिसांनी लगेच आरोपी असलेल्या बापाला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक गणेश होळकर आंनी आपल्या काही सहकाऱ्यासोबत त्याला नांदेड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. तपास श्री. होळकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT