Fifteen thousand tons Transportation Attempt of Nanded Railway sakal
नांदेड

नांदेड : एकाच दिवशी पंधरा हजार टन मालाची वाहतूक

नांदेड रेल्वेचा प्रयत्न : २.३३ कोटी मिळाला महसूल

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोनामुळे रेल्वे वाहतूक बंद होती. यादरम्यान रेल्वे प्रशासनाला महसूल मिळविण्यावर निर्बंध आले होते. त्यातून मार्ग काढून नांदेड रेल्वे विभागाने किसान रेल्वे तसेच मालगाड्यांच्या माध्यमातून महसुल मिळवला आहे. नांदेड रेल्वे विभागातून शनिवारी (ता.१२) एकाच दिवशी सहा मालगाड्या देशभरात रवाना झाल्या असून, त्यातून १५ हजार टन मालाची वाहतूक झाली आहे. त्यातून प्रशासनाला २.३३ कोटी रुपये महसूल एकाच दिवशी मिळाला आहे.

नांदेड रेल्वे विभागातून शनिवारी पहिल्यांदाच एकाच दिवशी सहा रेक मालगाड्या रवाना झाल्या आहेत. या सहा मालगाड्यांमधून देशातील विविध भागात १५ हजार १९५ टन माल वाहतूक करण्यात आली. ज्यातून रेल्वेला २.३३ कोटी उपाये महसूल मिळाला.

नांदेड विभागात स्थापन केलेल्या बिजिनेस डेव्हलपमेंट टीमच्या सततच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले. या यशाबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी बिजिनेस डेव्हलपमेंट टीमचे अभिनंदन केले. शनिवारी औरंगाबाद येथून दोन वर्षांच्या अवधीनंतर आसाम राज्यातील गुवाहाटी जवळ अझारा येथे साखरेची वाहतूक करण्यात आली. ज्यात दोन जार ६५८ टन साखर पाठविण्यात आली. आदिलाबाद येथून प्रथमच तामिळनाडू राज्यातील तीरुपूर आणि इरोड येथे ज्वारी पाठविण्यात आली. या रेकमधून दोन हजार ६६७ टन ज्वारी पाठविण्यात आली. दौलताबाद येथून जवाहरलाल नेहरू पोर्ट टर्मिनल येथे कंटेनर मधून एक हजार १८४ टन माल वाहतूक करण्यात आली.

तसेच नगरसोल येथून बिहार राज्यातील फातुवा येथे तीन हजार ३६४ टन कांदा पाठविण्यात आला. परभणी येथून पश्चिम बंगाल राज्यातील दानकुनी येथे दोन हजार ६६४ टन साखर पाठविण्यात आली. आणि वसमत येथून गुजरात राज्यातील चालठाण येथे दोन हजार ६५८ टन साखर पाठविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM KISAN 22nd Installment : महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, एका चुकीमुळे थांबला २००० रुपयांचा हप्ता; नेमकं काय घडलं ?

Leopard inside ZP School : बछड्यांना घेऊन बिबट्या आला शाळेच्या आवारात.., मुलं झाली भयभीत, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Mumbai: “तू खालच्या जातीचा…”; ब्रेकअपनंतर टोमणे; मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन, प्रेयसीवर SC-ST कायद्यांतर्गत गुन्हा

चूक नसतानाही प्राचार्यांकडून सर्वांसमोर पाईपने मारहाण, अपमान जिव्हारी; १९ वर्षीय विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

Tom Bruce: सहसदस्य देश केवळ विश्वकरंडकापुरतेच मर्यादित; स्कॉटलंडच्या टॉम ब्रुसची खंत!

SCROLL FOR NEXT