Nanded Education Department Recruitment esakal
नांदेड

Nanded News : शिक्षण विभागातील रिक्त पदे तत्काळ भरावी; आमदार जवळगावकरांच्या जिल्हा परिषद सीईओंना सूचना

Nanded Education Department Recruitment : तालुक्यातील होत असलेला ''शिक्षणाचा खेळखंडोबा'' याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत शैक्षणिक समस्येबाबत कशाप्रकारे मार्ग काढता येईल

गजानन पाटील

हदगाव : हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी याबाबत मोठी ओरड होत असतानाच ''हदगाव तालुक्यात शिक्षणाचा खेळखंडोबा'' या मथळ्याखाली ''सकाळ''ने छायाचित्रासह सविस्तर वृत्त मालिका चालविली होती.

याचीच दखल घेत हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक बोलावून मतदारसंघातील सर्व रिक्त पदांबाबतचा आढावा घेत शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे कायमस्वरूपी भरून रिक्त जागांवर शिक्षक उपलब्ध करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशा सूचना आमदार जवळगावकरांनी सोमवारी (ता. १) आढावा बैठकीतून दिल्या.

यावेळी काँग्रेस पक्षाचे हदगाव तालुकाध्यक्ष किशोर कदम रुईकर, हिमायतनगर तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, सरपंच संघटनेचे अनिल पवार करमोडीकर, सुभाष आला राठोड, सीताराम पाटील आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १९६ शाळा असून, बहुतांश शाळांवर शिक्षकांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत असल्याने ही पदे तत्काळ भरावी अथवा पर्यायी शिक्षक व्यवस्था लावून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कसे टाळता येईल याबाबतही खबरदारी घेतली पाहिजे, अशा सूचनाही आमदार जवळगावकरांनी यावेळी बोलताना दिल्या.

शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटूनही पंधरा शाळा अद्यापही उघडलेल्या नाहीत मतदारसंघातील खैरगाव ज., गणेशवाडी नवीन, पोटा तांडा, कोठा तांडा, कोठा ज., कोतलवाडी, खैरगाव ता., वडाचीवाडी, भिशाची वाडी, आंबेगाव, कपाट्याची वाडी,

आंदेगाव प., टेंभुर्णी घारापूर, पावणवाडी येथील शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटूनदेखील सुरू झाल्या नसल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना यास जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित होत असताना येथील रिक्त पदे तत्काळ भरून या शाळा पूर्ववत सुरू कराव्यात, अशा सूचनाही आमदार जवळगावकरांनी यावेळी बोलताना दिल्या.

अधिवेशन सुरू असतानाही आमदार जवळगावकरांकडून गांभीर्याने दखल

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाही आमदार जवळगावकर यांनी ''सकाळ'' वृत्त मालिकेची दखल घेत अगोदर तालुक्यातील शैक्षणिक समस्येकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर अधिवेशन महत्त्वाचे असे समजून घेत तालुक्यातील होत असलेला ''शिक्षणाचा खेळखंडोबा'' याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत शैक्षणिक समस्येबाबत कशाप्रकारे मार्ग काढता येईल या बाबीला प्राधान्य दिल्याने आमदार जवळगावकरांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT