nnd5sgp06.jpg 
नांदेड

तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली

हाफीज घडीवाला


कंधार, (जि. नांदेड)ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जगतुंग समुद्रातून होणारी मच्छीमारी थांबविण्यात यावी, असे आदेश तहसीलदारांनी पोलिसांना दिले असतानाही पोलिसांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. शनिवारपासून (ता.पाच) जगतुंगमधून मच्छीमारीला सुरवात झाली असून यामुळे नवरंगपुरा गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 


कोरोनामुळे जमावबंदी आदेश लागू 
(ता.२४) ऑगस्ट रोजी नवरंगपुऱ्यात एका कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला होता. यामुळे पूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. अशावेळी गंगापुत्र मच्छीमार संस्थेने शनिवारपासून तलावातून मच्छीमारीची तयारी सुरू केल्याने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शेख शेरूभाई व ग्रामस्थांनी बुधवारी (ता. दोन) तहसीलदारांना निवेदन देऊन गावात कोरोनामुळे जमावबंदी आदेश लागू असताना जगतुंगमधून मच्छीमारीला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली होती. 


सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 
तहसीलदारांनी लगेच बुधवारी पोलिस निरीक्षकांच्या नावे आदेश पारित करून जगतुंगमधून होणारी मच्छीमारी थांबवण्याचे म्हटले होते. तहसीलदारांनी आदेश पारित केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला खरा; परंतु शनिवारी (ता.पाच) सकाळपासूनच मच्छीमारांनी जगतुंगमध्ये उतरून मच्छीमारीला सुरवात केली. यामुळे जगतुंगच्या काठावर माशांच्या खरेदी-विक्रीसाठी बाहेरचे व्यापारी, शहरातील नागरिकांची झुंबड लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. गावात १४४ लागू असताना एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्रित आल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. 

नवरंगपुऱ्यात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करा, गावाची नाकेबंदी करा, गावातील लोक बाहेर जाऊ नये आणि बाहेरची लोक गावात येऊ नये अशा सूचना केल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली. मच्छीमारीमुळे कोरोना नियमाचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याने तहसीलदारांना निवेदन देऊन मच्छीमारी थांबविण्याची विनंती करण्यात आली होती. तहसीलदारांनी त्या अनुषंगाने नोटीस काढून पोलिस निरीक्षकांना उचित कार्यवाहीचे निर्देश दिले होते. एवढे होऊनही पोलिसांनी मच्छीमारी थांबवली नाही. 
- वसंत निलेवार, सरपंच प्रतिनिधी, नवरंगपुरा (ता.कंधार) 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SARATHI Scholarship Update : 'सारथी'च्या शिष्यवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध! मराठा-कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शिष्यवृत्तीसाठी कसा करायचा अर्ज?

Chandra Grahan Date and Time In India: उद्या भारतात वर्षातील पहिले चंद्रग्रहण दिसणार, जाणून घ्या सुतक वेळ अन् महत्त्व

खामेनेई ४५ वर्षांपासून लपवायचे उजवा हात, म्हणायचे, मला एका हाताची गरज नाही

Pune Metro Expansion : कोंढवा-येवलेवाडीकरांची चांदी! आता थेट मेट्रोने प्रवास; दक्षिण पुण्याचा कायापालट करणारा 20 किमीचा 'मेगा प्लॅन' तयार, कुठून-कसा असेल मार्ग?

'माझं खुप डोकं दुखायचं अन्...' नवरा माझा नवसाचा फेम अभिनेत्याला झालेला गंभीर आजार, म्हणाला...

SCROLL FOR NEXT