file photo 
नांदेड

जिल्ह्यातील पाहिजे असलेल्या पाच जणांना अटक- एलसीबीची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी का जाऊ दिले नाही म्हणून रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकाला मारहाण झाली होती. घटना घडल्यानंतर मारकरी फरार झाले होते. त्यापैकी दोघांसह अन्य तिन गुन्ह्यातील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
 
पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना जिल्हा व शहरातील माली गुन्ह्यातीन फरार आरोपीना पकडण्याच्या सुचना दिल्या. यावरुन श्री. चिखलीकर यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती हे आपल्या सहकाऱ्यासंह शहरात गस्त घालत होते. 

तलवार, हॉकी स्टिक, काठीने डोक्यात हातापायावर जबर मारहाण

शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे दिवसभर आपले कर्तव्य बजावून घरी निघण्याच्या तयारीत असलेल्या सुरक्षा रक्षकास दोन दुचाकीवरून आलेल्या सहा अनोळखी व्यक्तींनी त्याला अडविले. काही करण्याच्या अगोदरच त्यांनी त्यांच्याकडे तलवार, हॉकी स्टिक, काठीने डोक्यात हातापायावर जबर मारहाण केली. यात तो सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला. यानंतर मारेकरी पसार झाले. प्रकरणाचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. 

दोघांना नंदीग्राम सोसायटी नांदेड येथून अटक 

पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांनी या हल्लेखोरांपैकी दोघांना नंदीग्राम सोसायटी नांदेड येथून अटक केली. विजय राक्षसे व अमितसिंग या दोघांना अटक केली. त्यांच्या अन्य साथीदारांनी सुरक्षारक्षकास मारहाण केली होती.

एकाच दिवशी पाच गुन्हगांराना पकडले

तसेच या घटनेने अगोदर आठ दिवसापूर्वी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात आरोपीच्या पत्नीला प्रसूतीसाठी दाखल केले असता तिला भेटण्यासाठी नातेवाईकांना या सुरक्षारक्षकाने सोडले नव्हते. याचा राग मनात धरून सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावून या दोघांसह हत्यार बाळगणारे दोन आणि एका महिलेचा विनयभंग करणाऱ्यास ताब्यात घेतले. एकाच दिवशी पाच गुन्हगांराना पकडल्यामुळे पथकाचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी कौतुक केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT