Accident
Accident esakal
नांदेड

Bhokar News : एकाच चितेवर एकाच कुटुंबातील पाच जणांना दिला अग्नी! सवंगडी गेल्याने रेणापूरकरांची चूल पेटलीच नाही

सकाळ वृत्तसेवा

भोकर - ‘मुळ गाव सोडून भालेराव कुटुंब टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी रेणापुरात आलं. मिळेल ते काम करून चिलापील्यांच्या चोचीत घास भरवत संसार फुलविला. मंगलप्रसंगी शुभाशीर्वाद देवून परतताना काळाने घाला घातला. क्षणार्धात होत्याच नव्हते झालं. एकाच कुटुंबातील पाच जणांचा अपघातात मरण आलं.

एकाच चितेवर अग्नी देताना ग्रामस्थांच्या डोळ्यातील आसवांनी वाट मोकळी करून दिली. रेणापुरकरांनी चूल पेटवली नाही. मंगल प्रसंगी अमंगल घटनेने संवगड्यांची भेट होणे नाही म्हणत गाव शोकाकूल झालं.’

हदगाव तालुक्यातील कंजारा येथील मुळचे रहिवासी असलेल भालेराव कुटुंब तसे मेहनती, होतकरू, कष्टाळू असल्याने हातावरचं पोट भागवून संसार गाडा चालवीत असत. पुरेसे काम नसल्याने त्यावर भागत नव्हतं म्हणून गाव सोडून ते रेणापुर (ता.भोकर) येथे स्थायिक झाले. इकडे बऱ्यापैकी हाताला काम मिळू लागल्याने ते इथेच रमले. हलाखीच्या परिस्थितीत जगण्याचा मार्ग मिळाल्याने संसार फुलून आला होता.

तो प्रवास अखेरचा ठरला...

ग्रामस्थांच्या सुखदुःखात सहभागी होऊन एकरूप झाल्याने ते सर्वांना आपलंस वाटत होते. माणुसकीची शिदोरी पाठीशी बांधून ग्रामस्थांशी एकरूप झालेल्या संवगड्यावर असा प्रसंग येणार ही कल्पनाच कुणाच्याच ध्यानी-मनी नव्हती. एका मंगल प्रसंगी उपस्थित राहून परतताना भालेराव कुटुंबाचा तो प्रवास अखेरचा ठरला. असा माणुसकीचा झरा आटल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एकाच चितेवर अग्नी देताना आप्तस्वकीय, चाहते आणि संबंध ग्रामस्थांचा हुंदका दाटून आला आणि आसवांना वाट मोकळी करून दिली. सवंगडी गेल्याचे दुःख मनी साठवून रेणापुरकरांनी आज गावात चूल सुद्धा पेटवली नाही. शोकाकूल ग्रामस्थांनी अखेरचा निरोप देत त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर देवून दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT