file photo 
नांदेड

नांदेड शहरात दोन ठिकाणच्या कारवाईत पाच लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध विभागाची कारवाई

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरातील जुना गंज भागात तसेच सिडको परिसरात टाकलेल्या दोन वेगवेगळ्या धाडीत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ब्रँडचा बंदी असलेला चार लाख 78 हजार 780 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. यावेळी पथकाने एकाला अटक केली आहे.

राज्य सरकारने काही वर्षापूर्वी वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा तसेच पानमसाल्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीसुद्धा नांदेड शहर व जिल्ह्यात गुटख्याची सर्वत्र खुलेआम विक्री सुरु आहे. पानठेले, हाॅटेल, किराना दुकानामध्ये सर्रास बंदी असलेला गुटखा विकल्या जातो. अशा प्रकारच्या तक्रारी अन्न् व औषध प्रशासनाकडे मिळाल्या. यावरुन प्रशासनाने ता. नऊ मार्च रोजी सिडको परिसरात असलेल्या ढवळे कॉर्नर येथील ढवळे पान शॉपवर कारवाई केली. त्या अनुषंगाने पुन्हा त्याच रात्री जुना गंज भागात गोल्डन किराना येथेही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वेगवेगळ्या 28 ब्रँडचा चार लाख 78 हजार 780 रुपये किमतीचा गुटखा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेख खय्यूम शेख इब्राहिम विरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी (अन्न) प्रवीण काळे यांनी दिली.

नांदेड- पनवेल विशेष गाडीच्या 18 फेऱ्या रद्द 

नांदेड : सोलापूर विभाग मध्य रेल्वेमधील भाळवणी ते भिगवण या रेल्वे स्थानकादरम्यान हाती घेण्यात आलेले काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर रेल्वेगाड्या धावण्यासाठी इतर तांत्रिक कामे करण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे बऱ्याच रेल्वेगाड्यावर याचा परिणाम झाला आहे. सोलापूर विभागाने कळविल्यानुसार नांदेड रेल्वे विभागातील नांदेड- पनवेल- नांदेड या विशेष गाडीच्या 18 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे रद्द करण्यात आलेल्यात नांदेड ते पनवेल विशेष गाडी ता. 14 मार्च ता. 31 मार्च आणि पनवेल ते नांदेड ता. 15 मार्च ते ता. एक एप्रिल दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT