nanded
nanded nanded
नांदेड

नांदेडकरांसाठी चांगली बातमी! आता नांदेड-तिरुपती थेट विमानसेवा

अभय कुळकजाईकर

नांदेडसह मराठवाड्यातून हजारो भाविक तिथे जातात. थेट तेथे जाण्यासाठी नांदेडहून विमानसेवा असावी, अशी भाविकांची मागणी होती

नांदेड: नांदेडहून तिरुपती बालाजी येथे जाण्यासाठी आता थेट विमानसेवा येत्या मंगळवारपासून (ता. १७) सुरू होणार आहे. या सेवेसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रयत्न केले होते.
आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी देवस्थानला जागतिक पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व आहे. नांदेडसह मराठवाड्यातून हजारो भाविक तिथे जातात. थेट तेथे जाण्यासाठी नांदेडहून विमानसेवा असावी, अशी भाविकांची मागणी होती. त्यानुसार चव्हाण यांनी ट्रु जेट (TruJet) या विमान कंपनीशी अनेकदा चर्चा केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

नांदेड - तिरुपती व्हाया हैदराबाद अशी विमानसेवा सुरू होत आहे. या विमानसेवेला मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अमृतसर, कोल्हापूर ही शहले जोडली असून आता तिरुपतीची भर पडली आहे. सध्या सुरू असलेल्या ‘ट्रु जेट’ विमानसेवेचा विस्तार तिरुपतीपर्यंत होईल, अशी माहिती चव्हाण यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

मंगळवार, बुधवार, गुरुवार या दिवशी हे विमान तिरुपती - हैदराबाद - नांदेड - मुंबई - कोल्हापूर असा प्रवास करून त्याच दिवशी त्याच मार्गाने परतीच्या प्रवासासाठी तिरुपतीकडे निघणार आहे. संबंधित तीन दिवस सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी हे विमान नांदेड येथून निघून रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी तिरुपतीला पोचेल. तिरुपतीहून याच दिवशी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी निघणारे विमान नांदेडला सकाळी दहा वाजून २५ मिनिटांनी पोचेल. त्यानंतर मुंबई - कोल्हापूरसाठी ते झेपावणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharjeel Imam Bail: देशद्रोह प्रकरणात जामीन मिळूनही का होणार नाही शरजील इमामची सुटका; वाचा काय आहे प्रकार

Lok Sabha Election Predictions: अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही, जाणून घ्या बिग बॉस फेम अनिल थत्ते यांचं महाराष्ट्राचं भाकीत...

Loksabha Result: सी-व्होटरचा सर्वात मोठा अंदाज, 4 जूनपूर्वीच लावला निकाल; भाजपच्या जागा होणार कमी

T20 World Cup: है तैयार हम...! रोहित अन् हार्दिक पांड्या अ‍ॅक्शन मोडमध्ये; BCCI ने शेअर केला 'तो' 2 मिनट 12 सेंकदाचा Video

"तुमच्यामुळे शासनाची बदनामी झाली..." मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र लिहण्याऱ्या डॉ. भगवान पवार यांना नोटीस

SCROLL FOR NEXT