file photo 
नांदेड

कोरोना नियमावली पाळत भिमसैनिकांनी नांदेडमध्ये केले आपल्या उद्धारकर्त्यांना अभिवादन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : मागील वर्षापासून भिमजयंतीसह सर्वच सण उत्सवावावर कोरोनाचे सावट पसरले आहे. यावर्षी भिमजयंती मोठ्या थाटात होईल या आशेवर भिमसैनिक तयारी करत होते. मात्र पुन्हा कोरोनाची दुसरी लाट वेगाने आल्याने शासनस्तरावरुन पुन्हा नियमावली घालुन दिली. एवढेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ता. १४ एप्रीलच्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लावल्याने यावर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत साध्यापणाने साजरी करण्यात आली. तमाम भिमसैनिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार आपल्या उद्धारकर्त्यांना अभिवादन केले. 

भिमजयंतीवर कोरोनाचे सावट पसरल्याचे दिसून आले. प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेले लॅाकडाऊन व जमावबंदी आदेश यामुळे आंबेडकरी अनुयायांची अभिवादनासाठी होणारी गर्दी ओसरली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती असून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित येण्यास मज्जाव केला आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, हिंगोली गेट मार्ग बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांनासुद्धा प्रदेश मिळाला नाही.

दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त निळा सागर पुतळा परिसरात पहावयास मिळतो. लाखोंची गर्दी रस्त्यावर उतरत असल्याने संबंध शहरातील रस्ते गरर्दीने खचाखच भरलेले दिसुन येतात. परंतु यावर्षी मोजक्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना व कर्याकर्त्यांना अभिवादन करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. दरम्यान पुतळा परिसराची रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे पुतळा परिसरात झगमगाट पसरला होता. भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत आंबेडकरी अनुयायांनी अभिवादन केले. अशा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्यासह सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकारी या परिसरात लक्ष ठेवून होते. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन घरीच अभिवादन केले. डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर मसूदखान, उपायुक्त गुलाम सादिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक सुरेश गायकवाड, रमेश सोनाळे, राहूल प्रधान, भन्ते पय्याबोधी, बापूराव गजभारे, प्रकाश येवले, शंकर शिंगे, श्याम कांबळे यांच्यासह चळवळीतील कार्यकर्ते, बौद्ध अनुयायी, अधिकारीवर्ग यांनीही अभिवादन केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT