file photo 
नांदेड

अन्न व्यावसायीकांनो आरोग्याच्या दृष्टिने उपाययोजना करा- एफडीए

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अन्न व्यावसायिकांनी त्यांना दिलेल्या निर्धारीत वेळेच्या बंधनासहीत आरोग्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करुन व्यवसाय करावयाचा आहे. अन्यथा साथरोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंड संहिताचे कलमानुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असा मानण्यात येईल व त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी कळविले आहे. 
 
नांदेड जिल्हयातील सर्व घाऊक व किरकोळ किराणा आस्थापना कंटेनमेंट झोन वगळता यांच्या व्यावसायाची वेळ दररोज (रविवार वगळून) सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत करण्यात आलेली असुन अन्न व्यावसायिकांनी निर्देशित वेळेमध्ये आपला व्यवसाय करावा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निर्गमित केले आहेत.

हातामध्ये हॅन्डग्लोज व सॅनिटायझरचा वापर 

अन्न व्यावसायिकांनी व्यवसायाचे ठिकाणी स्वतः चे व कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहील या दृष्टीने दक्षता घ्यावयाची असुन, चेहऱ्यावर मास्क तसेच हातामध्ये हॅन्डग्लोज व सॅनिटायझरचा योग्य तो वापर करावयाचा आहे. व्यवसायाचे जागेत कामगार, ग्राहक यांच्या संबंधात सुरक्षित अंतर किमान एक मिटरचे राहील याबाबत दक्षता घ्यावयाची असुन, व्यवसायाच्या परिसरात एका वेळी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती एका ठिकाणी जमणार नाहीत याबाबत स्वतः उपाययोजना करुन, त्याची अंमलबजावणी करावयाची आहे. 

चेह-यावर मास्क न लावलेल्या ग्राहकांना अन्नपदार्थ विक्री करता येणार नाही

तसेच ग्राहकांचे (सोशल / फिजीकल डिस्टन्स) बाबतीत योग्य अंतर ठेवायचे असुन, अन्न हातळण्यापुर्वी सॅनिटायझरचा वापर करावयाचा आहे, किंवा हात साबणाने स्वच्छ धुण्याबाबत सुविधा उपलब्ध करुन द्यावयाची आहे. तसेच चेह-यावर मास्क न लावलेल्या ग्राहकांना अन्नपदार्थ विक्री करता येणार नाही, याबाबत त्यांना सुचित करावयाचे आहे. तसेच ग्राहकाकडून खरेदी नंतर पैसांची देवाण-घेवाण आर.बी.आय.च्या सुचनेनुसार ई-वॉलेटस् व स्वाईप मशीनद्वारे करण्यावर भर द्यावा.

साठेबाजी व काळाबाजार करु नका
 
अन्न व्यावसायिकांना असेही सुचित  करण्यात येते की,  सार्वजनिक आरोग्याचे दृष्टीने त्यांनी स्वतःची व कामगारांच्या आरोग्याबाबत दक्षता म्हणून स्क्रीनींक टेस्ट करुन घ्यावी तसेच घाऊक किराणा व्यावसायिकांनी खरेदी-विक्रीचा तपशिल व्यवस्थीत जतन करुन ठेवावा व कोणत्याही प्रकारे साठेबाजी व काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्धात एक्स्पायर झालेली क्षेपणास्त्रे वापरली; सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीसमोर सुनावणी

Truck Bike Accident : तेरवीहून परतताना पती-पत्नी ठार; शिंदोला मार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात

Chadrapur Crime : चंद्रपूर हादरले! चौकात कवटी, रेल्वे पटरीलगत मृतदेह; दोन्ही अवयव एकाच व्यक्तीचे असल्याचा संशय

Dengue-Like Infection : मुंढेत ४० जणांना डेंगीसदृश्य लागण; गावात खळबळ

Amravati Fire : वलगाव मार्गावरील हबीब नगर परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता; अडीच ते तीन तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण

SCROLL FOR NEXT