Forest Beding Sakal
नांदेड

Forest Beding: ‘फॉरेस्ट बेदिंग’ने करा मानसिक तणाव दूर; झाडांच्या सान्निध्यात मनाला मिळते शांती

स्वतःमध्ये तुम्हाला नक्कीच बदल जाणवतील

सकाळ डिजिटल टीम

Forest Beding - ‘फॉरेस्ट बेदिंग’ मध्ये जंगलातील वृक्ष आणि तिथल्या नैसर्गिक वातावरणात अधिकाधिक काळ घालवायचा असतो. यामुळे आरोग्यवर सकारात्मक परिणाम दिसून येतात.

निसर्गाच्या सानिध्यात दोन - तीन तास घालवल्याने मनाला शांतता मिळून अल्हाददायक वाटते. ‘फॉरेस्ट बेदिंग’ हा मानसिक तणाव आणि समस्या दूर करण्याचा सोपा उपाय आहे.

‘फॉरेस्ट बेदिंग’ची सुरुवात जपानमध्ये १९८० मध्ये झाल्याचे सांगितले जाते. यासाठी जंगलातच जावे लागेल, असे नाही. घराजवळ असलेल्या बागेत किंवा जिथे कुठे उंच - उंच झाडे आहेत, हिरवळ आहे तिथे एक - दोन तास घालवा. स्वतःमध्ये तुम्हाला नक्कीच बदल जाणवतील.

आजाराला दूर सारण्यात मदत

जे लोक ‘फॉरेस्ट बेदिंग’ साठी बाहेर पडतात ते कित्येक प्रकारच्या जीवघेण्या अशा कॅन्सरसारख्या रोगांपासून स्वतःला वाचवू शकतात. जितका तुम्ही झाडांच्या आजूबाजूला किंवा नैसर्गिक वातावरणात वेळ घालवाल, तितकी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने शरीराबरोबरच मेंदूलाही फायदा मिळतो.

तणावापासून मुक्तता

अमेरिकेतील एका संशोधनानुसार, नेचर वॉक आपल्या डोक्यातले विचार कमी करतो. एका युरोपीयन स्टडीनुसार, झाडांच्या सानिध्यात राहिल्याने पुरुषांच्या मृत्यूदरात १६ टक्क्यांनी घट होऊ शकते.

शिवाय निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने तणावापासून मुक्तीही मिळते. लक्ष केंद्रित होते. तसेच सर्जनशीलता वाढविते. पहिल्यापेक्षा अधिक आनंदी असल्याचे जाणवते.

असा करा उपाय

जिथे कुठे खूप हिरवीगार झाडे आहेत तिथे जाऊ शकता

कमीत कमी दोन तास तिथे फेरफटका मारा

घाईगडबडीत नाही तर निवांतपणे फिरत आजूबाजूचे वातावरण अनुभवा

उंच-उंच झाडे, आजूबाजूचा निसर्ग पाण्याचा आनंद लुटा

दीर्घ श्वास घ्या. फिरताना मध्येमध्ये बसत चला

झाडांना - पानांना आपल्या हातांनी स्पर्श करा

यामुळे तुमचे निसर्गावर प्रेम जडले असे वाटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Pimpalvandi Protest: पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जनसागर उसळला; नराधमाला २० दिवसांत फाशीची जोरदार मागणी

Mahagaon Rural Hospital: ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश; महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती

Pune Civic Politics: बालवडकरांनंतर टिंगरेंवरही भाजपचा रोष; पत्रप्रकरणातून राष्ट्रवादी-भाजप संघर्षाला पुण्यात नवे चिघळले रूप

Parenting Truth : आई-वडिलांना खरंच एखादं मूल जास्त आवडतं का? संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT