फोटो 
नांदेड

मुदखेड पंचायत समितीच्या माजी सभापतींची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या शिवकांता शत्रुघ्न गंड्रस (वय ३५) रा.डोणगाव (ता. मुदखेड) यांनी रविवारी (ता. २७) त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरा त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

शिवकांता गंड्रस यांनी डोणगाव (ता. मुदखेड) येथील त्यांच्या राहत्या घरी रविवारी (ता.२८) रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. शिवकांता गंड्रस यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ का आली? हे अद्याप तरी स्पष्ट झाले नाही. सदरील घटना घडल्याचे माहीत होताच घटनेची माहिती नातेवाईकांनी मुदखेड पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी आपल्या सहाकीर अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह खाली उतरून उत्तरीय तपासणीसाठी मुदखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. रात्री साडेदहाच्या सुमारास माजी सभापती शिवकांता गंड्रस यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. 

पंचायत समितीच्या अडीच वर्ष सभापती होत्या

शिवकांता गंड्रस या मुगट पंचायत समिती गणातुन काँग्रेस पक्षाकडुन मागील साडेतीन वर्षापूर्वी झालेल्या निवडणूकीत निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्या पंचायत समितीच्या सभापती झाल्या. त्यांनी अडीच वर्ष सभापतीपदाचा उत्तम कारभार सांभाळला. सध्या त्या विद्यमान पंचायत समिती सदस्या म्हणून पल्या गणात कार्यरत होत्या. परंतु त्यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. त्यांच्या पश्चात पती शत्रुघ्न गंड्रस, एक मुलगा, एक मुलगी, सासरे असा परिवार आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही

आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसुन तपास पोलिस निरीक्षक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. भाले, हवालदार श्री. पवार, श्री. शिंदे करत आहेत. पत्नीच्या आत्महत्येचा धक्का पतीला सहन झाला नसल्याने तिच्या चितेला भडाग्नी दिल्यानंतर काही तासातच त्यांनाही तिव्र ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तातडीने नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Petrol Diesel Price Today: रशिया-अमेरिकेत डिझेल महागले! भारतात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; पाहा ताजे रेट

SCROLL FOR NEXT