nanded nanded
नांदेड

Nanded Crime: नांदेडमधील आठ लाख चोरी प्रकरणी चार जणांना अटक

या चार संशयित आरोपींना तपासकामी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे

सकाळ वृत्तसेवा

या चार संशयित आरोपींना तपासकामी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे

नांदेड: शहरातील गोकुळनगर भागातील बालाजी ट्रेडर्स सिमेंट दुकानातून खंजरचा धाक दाखवून चोरांनी सात लाख ७० हजार रुपयांची सुटकेस बुधवारी (ता. ११) रात्री पळवून नेली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांना सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अजून एक संशयित असून, तो फरार आहे.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकदास चिखलीकर आणि त्यांच्या पथकाने राहुल ऊर्फ मुन्ना महेंद्र थोरात (वय २५), विशाल व्यंकटी वाघमारे (वय २५), संतोष आनंदराव झडते (वय २३, तिघेही रा. श्रावस्तीनगर, नांदेड) आणि दीपक नरहरी वाघमारे (वय २६, रा. कोटीतीर्थ, नांदेड) या चौघांना सापळा रचून अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्यासोबत असलेला मारोती ऊर्फ बाळू हरीभाऊ सरोदे हा अद्याप फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या चार संशयित आरोपींना तपासकामी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस निरीक्षक चिखलीकर यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, फौजदार आशिष बोराटे, दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, पोलिस जमादार करले, संजय केंद्रे, पोलिस नायक बालाजी तेलंग, म्हैसनवाड, अफजल पठाण, पोलिस शिपाई देवा चव्हाण, विलास कदम, गणेश धुमाळ, राजेंद्र सिटीकर, बजरंग बोडके, राजू पुलेवार, हनुमान ठाकूर, बालाजी मुंडे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

वैभव सूर्यवंशी अचानक पळत आला अन् गावसकर-बांगर यांच्यासमोर झाला नतमस्तक; SRH vs RR सामन्याआधीचा Video Viral

IND vs ENG: म्हणून हरमनप्रीत कौरसाठी आजची मॅच ठरणार 'अग्निपरीक्षा'; विश्वकरंडकापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान!

SCROLL FOR NEXT