korona new.jpg 
नांदेड

मंगळवारी चार रुग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मंगळवारी (ता. २३) जिल्ह्यात चार नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्ण संख्या ३२१ वर पोचली आहे. यासोबत पाच रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

नांदेडमधील तीन तर एक सोलापूरचा रुग्ण
मंगळवारी प्राप्त झालेल्या चाळीस अहवालापैकी २८ अहवाल निगेटीव्ह आले. तर चार अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. या चार नव्या रुग्णांत बिलालनगर भागातील पन्नास वर्ष वयाची महिला, बोरबन फॅक्ट्री परिसरातील ३५ वर्ष वयाचा एक व शहरातील इतर भागातील एक असे दोन रुग्ण आढळून आले. चौथा रुग्ण सोलापूर जिल्ह्यातील समर्थनगर येथे राहणाऱ्या पाच वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली. 

सात रुग्णांना सोडले घरी
यासोबतच मंगळवारी बरे झालेल्या सात रुग्णांना घरी सोडण्यात आले. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील एक, विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील पाच तर औरंगाबाद येथे संदर्भीत करण्यात आलेला एक अशा एकूण सात रुग्णांना समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २४५ व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. उर्वरीत ६२ रुग्णांपैकी दहा रुग्ण डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, पंजाब भवन कोविड केअर सेंटर ४६ रुग्ण तर सहा रुग्ण औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ३२१ बाधितांपैकी २४५ बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत ६२ बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील चार बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात ५० व ५२ वर्षाच्या दोन महिला तर ५२ व ५४ वर्षाच्या दोन पुरुषांचा समावेश आहे.

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती 
सर्वेक्षण- एक लाख ६२ हजार २२७
घेतलेले स्वॅब- पाच हजार ८१८
निगेटिव्ह स्वॅब- पाच हजार ५८ 
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- चार
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ३२१
मृत्यू संख्या- १४
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- २४५
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ६२
स्वॅब तपासणी चालू व्यक्ती- ८९ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT