nanded nanded
नांदेड

मुलाला कॅनडामध्ये नोकरी लावतो सांगून ३१ लाखांची फसवणूक

फसवणूक झाल्यामुळे त्यांनी पैसे परत मागण्यासाठी तिघांशी मोबाइलवर संपर्क साधला. मात्र त्यांनी ठार मारण्याची धमकी दिली

अभय कुळकजाईकर

फसवणूक झाल्यामुळे त्यांनी पैसे परत मागण्यासाठी तिघांशी मोबाइलवर संपर्क साधला. मात्र त्यांनी ठार मारण्याची धमकी दिली

नांदेड: मुलाला कॅनडामध्ये नोकरी लावतो, असे सांगून एका महिलेकडून ३० लाख ७५ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना शहरातील गुरुद्वारा लंगर साहिब येथे घडली. याप्रकरणी तीन संशयितांविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १३) गुन्हा दाखल झाला. त्यात दोन महिलांचा समावेश आहे.

शहरातील वजिराबाद भागात नगिना घाट परिसरातील गुरुद्वारा लंगर साहिब येथे जगदीपकौर हरपालसिंघ संधू (वय ४६, मूळ रा. भूमी गार्डन प्लॉट नं. सात, सेक्टर १७, कलंबोली रस्ता, पाली, नवी मुंबई) या सेवा करण्यासाठी राहतात. त्यानिमित्ताने ओळखीतून त्यांच्याकडे रणजितसिंघ, दिव्या शर्मा आणि कुलवंत कौर असे तिघेजण आले. तुमच्या मुलाला कॅनडात नोकरी लावून देतो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी खोटा व्हिसा तयार करून तो खरा असल्याचे भासवला. त्यांच्याकडून सहा ऑगस्ट २०१९ ते २० ऑगस्ट २०१९ दरम्यान टप्प्याटप्प्याने ३० लाख ७५ हजार रुपये घेतले. मात्र, मुलाला नोकरी मिळाली नाही.

फसवणूक झाल्यामुळे त्यांनी पैसे परत मागण्यासाठी तिघांशी मोबाइलवर संपर्क साधला. मात्र त्यांनी ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फौजदार जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: राज ठाकरेंसाठी शरद पवार आग्रही; काँगेसलाही दिला मेसेज, उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

Horoscope Prediction 2025: उद्या तयार होतोय केंद्र त्रिकोण योग, शनिदेवाच्या आशीर्वादाने मेष अन् मिथुनसह 'या' 5 राशींचे उजळेल भाग्य

Couvade Syndrome: चक्क पुरुषांनाही जाणवतात प्रेग्नन्सीसारखी लक्षणं? जाणून घ्या काय आहे ‘कूवाडे सिंड्रोम’

Stock Market Today : शेअर बाजार आठवड्याच्या शेवटी लाल रंगात बंद; फक्त तीन शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर!

Tejas Fighter Jet Crash: एअर शोमध्ये मोठा अपघात! भारताचे तेजस लढाऊ विमान कोसळले; थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT