chana dall.jpg 
नांदेड

अर्धापुरात चना डाळीला फुटले पाय

लक्ष्मिकांत मुळे

अर्धापूर, (जि. नांदेड) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिधापत्रिकाधारकांना मोफत दाळ वाटपात अनियमितता झाल्याच्या तक्रारी लाभधारक करीत आहेत. तर पुरवठा विभाग तीन महिन्यांची डाळ रास्तभाव दुकानधारकांना वाटपासाठी दिला होती असे सांगत आहेत. शहरातील व तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना गेल्या तीन महिन्यांपासून मोफत तूर, चना डाळीचे वाटप झाले नाही. गौरी लक्ष्मीच्या सणाला तरी मोफत डाळीचे वाटप करावे अशी मागणी लाभार्थी करत आहेत. याकडे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.


मोफत डाळीचे वाटप झाले नाही
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व केंद्र सरकार राज्यातील अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी व अंत्योदय योजनेचे लाभार्थ्यांना दर महिन्याला एका कार्डधारकांना एक किलो तूर किंवा चना डाळ मोफत देण्याची घोषणा केली होती. फक्त एप्रिल व मे महिन्यात मोफत डाळीचे वाटप झाले. त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांपासून मोफत डाळीचे वाटप झाले नाही.


मोफत डाळ गेली कुठे 
मोफत डाळीच्या वाटपाच्या निर्णयाप्रमाणे एक किलो तूर डाळ व दोन किलो चना डाळ तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी प्राप्त झाली. तूर डाळीचे वाटप झाले. शहरासह तालुक्यातील काही रास्तभावधारकांनी दोन किलो चना डाळ वाटप न करता एक किलोच चना डाळ वाटप केल्याच्या तक्रारी लाभधारक करीत आहेत. याप्रकरणी पुरवठा विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की आम्ही तीन महिन्यांच्या मोफत डाळीचे वाटप स्वस्त धान्य दुकानदाराकडे केले आहे. तर लाभार्थी म्हणतात, की आम्हाला दोनच महिने मोफत दाळ भेटली आहे. एका महिन्याची मोफत डाळ गेली कुठे अशी चर्चा शिधापत्रिकाधारकांत आहे.


चौकशी करून कार्यवाही
मोफत तूर व चना डाळ ही एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांची दुकानदारांना देण्यात आली आहे. जुलै व ऑगस्ट महिन्याची मोफत डाळ उपलब्ध झाली नाही. आल्यानंतर देण्यात येईल. ज्या स्वस्त धान्य दुकानदारांनी तीन महिन्यांची मोफत डाळ वाटप केली नाही, त्यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल असे डी.एन. जाधव, पुरवठा अधिकारी यांनी सांगितले.


सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यास लुटले
शहरातील सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यास आसना नदीच्या पुलाजवळ डोळ्यात मिर्ची पूड टाकून व धारदार शस्त्रांनी मारहाण करून लुटण्याची घटना शुक्रवारी (ता.२१) रात्री झाली आहे. या लुटमारीत अज्ञात तीन चोरट्यांनी पावणेसहा लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की अर्धापूर शहरातील सराफा बाजारात नंदकुमार लोलगे यांचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. त्यांनी शुक्रवारी दिवसभर व्यापार करून सायंकाळी आपल्या स्कुटीवरून (एमएच-२६, बीए-१५४३) नांदेडला निघाले. त्यांची स्कुटी आसना पुलाजवळील दशमेश पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर आली असता, दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी आडवली. नंदकुमार यांच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकून धारदार शस्त्रांनी मारहाण केली; तसेच स्कुटीच्या डिकीची किल्ली हिसकावून घेऊन डिकीतील पावणेसहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी नंदकुमार लोलगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन चोरट्यांविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गॅस संपला तरी चिंता नाही! आता Instamart वरून काही मिनिटांत घरपोच LPG सिलेंडर मिळणार; पण कसा आणि कुणाला?

IND vs ENG 2nd ODI: भारत-इंग्लंड दुसऱ्या सामन्याची वेळ बदलली; जाणून घ्या फ्रीमध्ये कुठे पाहता येईल मॅच

Latest Marathi News Update : पावसाबाबत हवामान विभागाचा मोठा अंदाज, नेमका कधी परतणार? वाचा...

Pune: वैद्यकीय निष्काळजीपणा सिद्ध न झाल्याने ९० लाख रुपयांच्या भरपाईची तक्रार फेटाळली; राज्य ग्राहक आयोगाचा आदेश

Wari News: श्री संत गोरोबाकाका पालखी रथाच्या बैलावर वळूचा हल्ला; रात्रभर जागून बैलांचे केले संरक्षण; वडगाव निंबाळकर येथे घडला थरार; उपचारानंतर सकाळी बैलजोडी सुखरूप मार्गस्थ

SCROLL FOR NEXT