file photo  
नांदेड

शैक्षणिक वर्षाचे मोफत पाठ्यपुस्तके केंद्रात पोहचले  

नवनाथ येवले

नांदेड : जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग येत्या शैक्षणिक वर्षासाठी सज्ज झाला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनामार्फत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन लाखावर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या मागणीनुसार बालभारतीकडून पाठ्यपुस्तके केंद्रस्तरावर पोहच झाली आहेत. मात्र,  कोरोनामुळे शाळा कधी सुरू होणार याबाबत अजूनही अश्चितता असून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेश करण्यात येत आहेत.   

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षात विद्यर्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना वरच्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे . मात्र, शाळा कधी सुरू होतील या बाबत अद्यापी आदेश नाहीत. लॉकडाउनपूर्वीच नवीन शैक्षणिक वर्षातील विविध पाठ्यपुस्तकांची छपाइ झाली होती. वाहतूक बंद असल्याने पुस्तके जिल्ह्यात पोहोचली नव्हती. 

शिक्षण विभागाकडून जिल्ह्यात पहिली ते पाचवीपर्यंत उर्दू व मराठी माध्यमांंसाठी दोन लाख १४ हजार ७३८ पुस्तकांची तर सहावी ते आठवीच्या वर्गासाठी एक लाख २५ हजार ७८ पुस्तकांची बालभारतीकडे मागणी करण्यात आली होती. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या मागणीनुसार बालभारतीकडून पुस्तके तालुकास्तरावर प्राप्त होत आहेत. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत पुस्तकांचे वाटप करण्यात येत आहेत. 

प्राथमिक शिक्षण विभागांमार्फत शाळास्तरावर भौतिक सुविधांचा आढवा घेण्यात येत असल्याने शाळा ऑनलाईन सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर दूसरीकडे मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू असल्याने शाळा कधी आणि कशा सुरू होणार या विषयी अश्चितता आहे. ऑनलाईन शाळा सुरू करण्यासाठी  शिक्षण विभाग शाळास्तरावर तांत्रीक बाबीची पुर्तता करण्याच्या तयारीत आहे.  

शाळेत संगणक कक्षासह ॲनरॉइड मोबाइलच्या उपलब्धते विषयी व्यवस्थापन समितीकडून पालकांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, ऑनलाइन शाळा सुरू झाल्याच तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण त्यातच पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे काय असे अनेक प्रश्न निर्माण होत असताना पाठ्यपुस्तक वाटपाने त्यात भर पडली आहे. 
 
येथे क्लिक करा -  
धोपटी आंंदोलकांवर गुन्हे दाखल...कुठे ते वाचा... ? ​

शासन आदेशानुसार तालुकास्तरावरुन केंद्रस्तरावर केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांकडे यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे पुस्तके वाटप करण्यात येत आहेत. शाळा सुरू करण्याविषयी अद्याप शासनस्तरावरून ठोस निर्णय नाही. मार्गदर्शक सुचनांनुसार शाळास्तरावर भौतिक सुविधांचा आढावा घेण्यात येत आहे 
प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT