एफआरपीचे धोरण  sakal
नांदेड

एफआरपीचे धोरण रद्द न केल्यास रस्त्यावर उतरू

आत्माराम पाटील वाटेगावकर ः ६०-४० च्या फार्म्युल्याने आत्महत्या करण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

हदगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याबाबत केंद्र सरकारने जो निर्णय घेतला तो निर्णय अतिशय चुकीचा असून या धोरणामुळे अगोदरच या ना त्या कारणामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ तर आलीच असून आता या नवीन धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याला गळफास घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. एफआरपीबद्दल जो ६०-४० चा फार्मूला लागू केला तो त्वरित मागे घेऊन एफआरपीची रक्कम पूर्वीप्रमाणेच ८०-२० याप्रमाणेच द्यावी अन्यथा केंद्र शासनाच्या या धोरणाविरुद्ध आपण सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधव रस्त्यावर उतरू असा इशारा शेतकरी नेते आत्माराम पाटील जाधव वाटेगावकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

श्री सुभाष साखर कारखाना प्रशासनासह साखर आयुक्त, नांदेड व उपविभागीय अधिकारी, हदगाव यांना हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदन दिले असून या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शेतकरी रात्री-बेरात्री ऊसाला पाणी देऊन ते पीक जोपासतात. असे करत असताना शेतकऱ्यांना हिंस्त्र प्राणी साप, विंचू आदी विषारी प्राण्यांचा सामना करावा लागतो. विजेचे भारनियमन ऊन पाऊस, वारा आणि गारा या सर्व नैसर्गिक आपत्तींचा सामना करत असताना अनेक संकटे शेतकऱ्यांवर येतात. एकीकडे शासन एफआरपी बाबतचे ६०-४० चे धोरण रद्द करून पूर्वीप्रमाणेच ८०-२० याप्रमाणे एफआरपीची रक्कम द्यावी लागणार आहे. अन्यथा शेतकरी आपले जीवन संपविल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शासनाने पूर्वीप्रमाणे ८०-२० याप्रमाणे तरी देण्याची आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आम्हा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या या जुलमी धोरणाविरुद्ध रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरलेला नाही असे वाटेगावकर यांनी निवेदनात कळविले आहे.

केंद्र सरकारचा जाहीर निषेध

केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रती अन्याय करण्याची भूमिका बजावली असून शेतकऱ्यांची आर्थिक नाडीच बंद करण्याबाबत पावले उचलल्याचे या नवीन अवलंबविलेल्या धोरणावरुन स्पष्ट होते. शेतकऱ्यांना अधिकची आर्थिक मदत करण्याऐवजी आहे त्या मध्येच तीन टप्प्यात रक्कम देण्याबाबतचे हे धोरण चुकीचे असून या चुकीच्या धोरणाबद्दल केंद्र शासनाचा आम्ही निषेध करतो. वेळप्रसंगी तुरुंगातही जाण्याची तयारी ठेवली असल्याचे शेतकरी नेते आत्माराम पाटील जाधव वाटेगावकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT