Mumbai Local: लोकलचा स्पीड आणखी वाढणार, दररोज ४,००० फेऱ्या; रेल्वे प्रशासनाची नवी योजना, कधीपासून होणार सुरु?

Mumbai Local Kavach 5.0 System: मुंबई लोकलमध्ये लवकरच 'कवच ५.०' ही संरक्षण प्रणाली सुरू केली जाणार आहे. या प्रणालीमुळे लोकलचा स्पीड आणखी वाढणार असून दर दोन मिनिटांनी लोकल धावणार आहे.
Mumbai Local Kavach 5.0 System

Mumbai Local Kavach 5.0 System

ESakal

Updated on

मुंबई : उपनगरी रेल्वे सेवेत लवकरच 'कवच ५.०' ही अत्याधुनिक स्वदेशी ट्रेन संरक्षण प्रणाली दाखल होणार आहे. या प्रणालीमुळे लोकल गाड्यांमधील वारंवारता सध्याच्या तीन मिनिटांवरून दोन मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. परिणामी लोकल फेऱ्यांची संख्या ३,२५४ वरून सुमारे चार हजारांपर्यंत वाढविता येणार असल्याने महामुंबईतील लाखो प्रवाशांना दिलासा मिळण्याबरोबरच सुरक्षिततेतही मोठी भर पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com