girish mahajan and sanjay raut esakal
नांदेड

Girish Mahajan : संजय राऊत म्हणजे बांग देणारा कोंबडा

भाजपच्या पक्ष कार्यालयात झालेल्या संघटनात्मक बैठकीत गिरीश महाजन बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - ‘मी सात वेळा जनतेतून निवडून आलो आहे. खासदार संजय राऊत हे बांग देणारा कोंबडा आहेत. त्यांनी स्वतःसाठी सुरक्षित असलेला मतदारसंघ निवडावा आणि निवडणूक लढवून दाखवावी. तिथे मी निवडणूक लढायला तयार आहे, असे आव्हान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी दिले.

भाजपच्या पक्ष कार्यालयात झालेल्या संघटनात्मक बैठकीत महाजन बोलत होते. ते म्हणाले, ‘भाजपचे पक्षसंघटन मजबूत आहे. कार्यकर्त्यांच्या जिवावर चालणारा हा पक्ष आहे. संघटनेच्या बळावर काम असल्याने सातत्याने यश मिळते. मागच्या दाराने निवडून येणारे खासदार संजय राऊत हे इतरांवर खालच्या पातळीवर टीका-टिपण्णी करतात, दुसऱ्यांची लायकी काढतात.

त्यांना दररोज सकाळी कोंबड्याप्रमाणे बांग द्यायची सवय लागली आहे. लायकी काढणाऱ्या व महायुतीवर टीका करणाऱ्या संजय राऊतांनी एक तरी आमदार, खासदारकीची निवडणूक लढवली आहे काय?’ असा सवालही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT