अर्धापूरच्या तरुणाची हीच ती विजेवर चालणारी सायकल 
नांदेड

भन्नाट आयडीया : अर्धापूरातील सुशिक्षित तरुणांने तयार केली विजेवर चालणारी सायकल

अर्धापूर शहरातील बसस्थानक परिसरात शिवहार घोडेकर याची पानटपरी आहे. तो सुशिक्षित बेरोजगार आहे. त्याने रेल्वे, महावितरण याठिकाणी कंत्राटी पदावर नोकरी केली

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : दिवसागणिक वाढणारे इंधानाचे भाव, या वाहनांमुळे होणारे प्रदूषण,आजार या समस्यांनी सर्वच त्रस्त झाले आहेत. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अर्धापूर शहरांमध्ये पान ठेला चालवत पान सुपारी, पान विक्री करत शिक्षण पूर्ण केलेल्या एक तरुणांने भन्नाट आयडीया करुन विजेवर चालनारी सायकल तयार केली. सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम शिवहार घोडेकर यांनी केले आहे

अर्धापूर शहरातील बसस्थानक परिसरात शिवहार घोडेकर याची पानटपरी आहे. तो सुशिक्षित बेरोजगार आहे. त्याने रेल्वे, महावितरण याठिकाणी कंत्राटी पदावर नोकरी केली. गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाउनमुळे बेरोजगार असलेल्या तरुणाने दुकानावर व शेतीकडे ये- जा करण्यासाठी बनविली पूरक व प्रदूषणमुक्त सायकल. त्याच्या या कलेची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

हेही वाचा - महाआवास घरकुल बांधकामात हिंगोली विभागात अव्वल

दिवसेंदिवस होत असलेले प्रदूषण व वाढत्या पेट्रोलच्या किंमतीवर पर्याय काढत अर्धापूर शहरात पानठेला चालवणाऱ्या शिवहार घोडेकर या तरुणाने विद्युत वर चालणारी अनोखी सायकल बनवली आहे. फक्त चौदा हजार रुपयामध्ये चार तास चार्जिंगवर ३५ ते ४० किमीचे अंतर पार करता येते.

दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. त्यावर पर्यायी मार्ग काढत अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौक परिसरामध्ये रहात असलेल्या शिवहार प्रकाश घोडेकर या ३२ वर्षीय तरुणाने इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणारी प्रदूषणमुक्त अशी सायकल तयार केली आहे. फक्त पाच रुपये खर्चामध्ये चार तास चार्ज केल्याने तब्बल चाळीस किलोमीटरचे अंतर सायकलने पार करता येते. त्यांने चार्जिंगवरील सायकल बनवण्याचा प्रयोग करण्याचा संकल्प केला व विजेवर चालणारी सायकल तयार करत आपले स्वप्न सत्यात उतरविले आहे. त्यांच्या या वैज्ञानिक कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहने अनेकांनी बघितली आहेत. मात्र चार्जिंगवर बनवलेली सायकल पहिल्यांदाच बघण्यात येत असल्याने नागरिकांना कुतूहल वाटत असून ही सायकल बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

येथे क्लिक करा - UPSC NDA/NA II परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया आज होणार समाप्त

पाच रुपयात ४० किमी पार

१४ हजार रुपये खर्च आला असून मोटार २४ होल्ट ३५० वॅट, बॅटरी २४ होल्ट ३५० वॅट, चार्जिंग किट, लाईट, गिअर एक्सलेटर, इलेक्ट्रिक ब्रेक आदींसह वेल्डींगचा वापर करत ही सायकल बनविण्यात आली आहे. पाच रुपये दराच्या चार्जिंगवर ४० किमी अंतर पार करता येते. यावेळी शिवहार घोडेकर म्हणाला की वाढत्या इंधन दरवाढीमुळे विजेवर चालणारी सायकल बनवली आहे. पुढील काळात सायकल चालवताच चार्जिंग व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT