file photo 
नांदेड

Good News:राज्यातील 603 सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती

प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने 603 सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यासाठी संवर्गनिहाय माहिती पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस महासंचालक कार्यालयाच्या ई-मेलवर ही माहिती ता. चार फेब्रुवारीपर्यंत सादर करायची आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांच्या स्वाक्षरीने हे पत्र सोमवारी (ता. एक) फेब्रुवारी रोजी निर्गमित करण्यात आले आहे. राज्यातील नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण विभाग, पुणे, कोकण विभाग दोन आणि नाशिक अशा सात विभागीय परिक्षेत्रांमध्ये एकूण 603 सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना पदोन्नती मिळणार आहे.

त्यात नागपूर- 35, अमरावती- 17, औरंगाबाद- 22, कोकण- सात, नाशिक- 9, कोकण दोन- 451, पुणे- 62 अशा एकूण 603 सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना पोलिस निरीक्षक पदाची पदोन्नती दिली जाणार आहे. सर्व पोलिस घटक प्रमुखांना त्यांच्याबद्दलची माहिती कशी पाठवावे आणि त्यांना पुढील कर्तव्यासाठी कोणत्याही भागात जाणे पसंत आहे असे सर्व माहिती जमा करायचे आहे. नांदेड जिल्ह्यातील पाच सहायक पोलिस निरीक्षक यांचा यात समावेश असून नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेले सुनील रावसाहेब पुंगळे, अशोक तुकाराम जाधव, विनोद मारोतीराव सलगरकर, सुनील चंद्रकांत नाईक आणि रमाकांत धोंडीराम पांचाळ अशा पाच सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RuPay Card Changes: RuPay कार्डधारकांना धक्का! 1 एप्रिलपासून नियम बदलणार; PNB-HDFC चा मोठा निर्णय

Pune News: ह्रदयद्रावक घटना! गावाला रस्ता नसल्याने वेळेवर मिळाले नाहीत उपचार, चिमुकल्याचा वाढदिवशीच करुण अंत..

IPL 2026 Marathi News: रोहित शर्मा Impact Player म्हणून खेळणार? सराव सुरू; मुंबई इंडियन्सची Playing XI कशी असणार?

Education Department: शिक्षण विभाग ‘मनोहर’वर मेहरबान; देवळी कला मारहाण प्रकरण, शिक्षकावर कारवाई केव्हा?

HPCL Jobs Alert: सरकारी नोकरीचा बंपर चान्स! डिप्लोमा ते CA उमेदवारांसाठी लाखोंच्या पगारासह HPCL मध्ये 700+ जागा, असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT