file photo 
नांदेड

गुड न्यूज : नांदेड कारागृहातील ७४ कैदी कोरोनामुक्त

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात कोरोना आपले हातपाय चांगलेच पसरत असून जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे. त्यातच जिल्हा कारागृहातील तब्बल ८१ कैद्यांना कारोनाची लागन झाल्याचे ॲटीजेन रॅपीड टेस्ट तपासणीत पुढे आले होते. त्यांच्यावर कारागृहातील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार केल्यानंतर त्यातील ७४ कैदी मंगळवारी (ता. २२) कोरोनामुक्त झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यात सर्वच क्षेत्रातील नागरिकांना कोरोनाची बाधा पोहचलेली आहे. दररोज तीनशेहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. तर शंभरपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज दिल्या जात आहे. कोरोना बाधीतांची संख्या वाढत असताना मृत्यूंचा आकडाही तसाच वाढत असल्याने प्रशासन हतबल होत असल्याचे पहावयास मिळत आहे. कोरोना बाधितांची संख्या रोखण्यास जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांना या बाबत सध्या तरी अपयश येत असल्याचे दिसून येते.
 
ॲन्टीजेन टेस्ट वरून कोरोनाचे निदान

कोरोना बाधीत क्षेत्रातील नागरिकांसह सर्दी व ताप असलेल्या सर्वांची तपासणी ॲन्टीजेन रॅपीड टेस्टद्वारे होत आहे. त्यात तपासणी केल्यानंतर काही मिनिटातच रुग्णाचा अहवाल येत आहे. त्यामुळे अहवालाची वाट पाहण्याची वेळ आता तपासणी केलेल्या व्यक्तीला गरज नाही. शहराच्या विविध भागात ॲन्टीजेन टेस्ट करून कोरोना बाधीत आढळल्यास त्याच्‍यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत. परंतु सध्या खासगी व शासकिय रुग्णालय फुल्ल झाल्याने बाधीत रुग्णांवर उपचार आपल्या घरीच घ्यावा लागत आहे.

८० पैकी ७४ कैदी कोरोनामुक्त 

जिल्हा कारागृहात न्यायालयाच्या आदेशावरुन कैदी व तेथील कर्मचाऱ्यांची ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आली होती. या तपासणीत एक नव्हे तर तब्बल ८० कैदी आणि एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागन झाल्याचे तपासणीत पुढे आले होते. या प्रकरणी कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की यापैकी ७४ जण कोरनामुक्त झाले आहेत. बाकीच्या रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांचीह प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shikhar Dhawan: कायदेशीर सामना धवनने जिंकला! पहिल्या बायकोकडून मिळणार ५.२ कोटी, आयेशासाठी वाढल्या अडचणी

Holi 2026: होळीवर ग्रहणाचा वेळ किती असेल? भद्रा कधीपर्यंत राहील, होलिका दहनाचा मुहूर्त येथे जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : दुष्ट आणि अनैतिक व्यक्तीला शंकराचार्य म्हणणे हा सनातन धर्माचा घोर अपमान

Agricultural News : कांदा उत्पादकांसाठी गुड न्यूज! निर्यात शुल्कातील जाचक अटी हटवल्या; आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा कायम राहणार

Kagal Accident : पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; कागलच्या ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT