deepak shingde 
नांदेड

Good News : प्लाझ्मासाठी स्वतः हुन दीपक शिंगडे पुढे आले आणि रुग्णांचे नातेवाईक गहिवरले

कोविड- १९ मदतीचा हात " ( हेल्पिंग ग्रुप ) च्या हेल्पलाईनवर मंगळवारी (ता. चार) एका रुग्ण नातेवाइकांचा कॉल.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोविड रुग्णासाठी प्लाझ्मा (Plazma donate) मिळवण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. त्यात अपेक्षित यश मिळेल याची शाश्वती नसते. कधीकधी तो प्लझ्मा जुळत नाही. तो देण्यासाठी स्वतः हून पुढे येणारे फारच कमी. लोह्यात शिक्षण झालेले पण अहमदपूर (Ahmadpur) येथे वास्तव्याला असलेले युवा कार्यकर्ते नगरसेवक दीपक वामनराव शिंगडे ( Deepak shingde) हे स्वतःहून प्लाझ्मा दान देण्यासाठी पुढे आले. लातूरहुन उदगीरला तो प्लाझ्मा रुग्णाला देण्यात असला. रुग्ण नातेवाईकांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. त्यांनी दिपकची कृतज्ञात व्यक्त केली. Good News: Deepak Shingade himself came forward for plasma and the relatives of the patients were devastated

कोविड- १९ मदतीचा हात " ( हेल्पिंग ग्रुप ) च्या हेल्पलाईनवर मंगळवारी (ता. चार) एका रुग्ण नातेवाइकांचा कॉल. औराद तालुक्यातील 'चिखली' गावच्या कोरोनाबाधित रुग्णाला "AB "निगेटिव्ह प्लाझ्मा लागणार आहे. आणि लगेच आपल्या टीमने क्षणाचाही विलंब न करता याची दखल घेऊन प्लाझ्मा असलेला व्यक्ती कोठे आहे का तपासायला सुरुवात केली. आपल्या हेल्पिंग ग्रुपची दखल घेऊन अहमदपूर नगर पालिकेचे नगरसेवक दीपक वामनराव शिंगडे ( वय 42) यांनी स्वतःहून मला कोविड होऊन 28 दिवस झाले आहेत आणि मी प्लाज्मा देण्यास तयार झाला.

हेही वाचा - नांदेड : अवघड क्षेत्रातील निकष पात्र शाळा अपात्र; शिक्षणाधिकाऱ्यांची मनमानी

एबी निगेटिव्ह हा रक्त ग्रुप तसा दुर्मिळच. दीड महिन्यापूर्वीच दीपक यांच्या वडीलांचे निधन झाले. आई कलावतीबाई शिंगडे या लोह्याच्या शिवछत्रपती प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका. त्यांनाही कोविड संसर्ग झालेला तसेच पत्नी मीनाक्षी ज्या की अहमदपूर नगर पालिकेच्या माजी सभापती त्यांना कोरोनाची लक्षणे होती. तसेच भाऊ प्रकाश, भावजयी महानंदा या सर्वांना कोविड झाला. त्यातून हे कुटुंब अद्याप सावरले नाही. स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. जयश्री साब्दे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री कलमे या दोन डॉक्टर बहिणींनी उपचार केले. दीपक हा धाडसी, त्याचा मोठा मित्रपरिवार व हळव्या मनाचा, सहकार्य वृत्तीचा त्यांनी आपले दुः ख बाजूला ठेऊन सरळ प्लाझ्मा देण्यासाठी पुढे आला.

"एकमेका साह्य करू ...या

या विचारांचा प्रेरित झालेला हा ग्रुप दुपारी एक वाजता अहमदपूर ते लातूर या प्रवासाला. सर्व प्रोसेस पूर्ण झाली संध्याकाळी पाचच्या सुमारास प्लाझ्मा डोनेट केला. आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला तो सत्कर्म केल्याचा आनंद ..!! आणि रुग्ण नातेवाईक यांच्या डोळ्यात अश्रू ...कृतज्ञात भाव ..कोण कुठले..पण माणुसकीने हे सर्वजण जीव वाचविण्यासाठी यांची धडपडत.

खरंच त्यांचे कार्य शब्दांत मांडता इतपत सोपं नाही. दीपकसारख्या व्यक्तित्वामुळेच अजूनही माणुसकी जिवंत आहे. तुम्ही पण कोरोनामुक्त होऊन २८ दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असतील तर प्लाझ्मा डोनेट करुन एखाद्याचा जीव वाचवू शकता. कोरोनातून बरे झालेल्या सर्वांनी प्लाझ्मा डोनेशन करावे असे आवाहन दीपक शिंगडे व मित्रांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT