hospital nanded
hospital nanded 
नांदेड

Good News : सिटी स्कोअर २४ असतानाही रुग्णाला ठणठणीत बरा करण्यास डाॅक्टरांना यश

प्रमोद चौधरी

नांदेड ः कोरोना बाधीत झाल्यानंतर (Corona possitive) सर्वप्रथम शासकीय रुग्णालय कळमनुरीत उपचार घेतले. तब्येत बिघडल्याने तीन दिवस नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊनही सुधारणा न झाल्याने हैद्राबादला हलवले. तेथेही सुधारणा झाली नाही. शेवटी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात (government hospital nanded) भरती केले. तेथे सीटी स्कोअर २४ असतानाही शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर रुग्णाला ठणठणीत बरा करुन घरी सुट्टी दिली. (Good News: Doctors succeed in curing the patient in spite of City Score 24)

वारंगाफाटा (ता. कळमनुरी) येथील संजय पतंगे (वय ४६) यांना ता. २६ मार्च रोजी कोरोना आजाराने गाठले. त्यानंतर त्यांनी कळमनुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. मात्र, परिस्थिती गंभीर होत असल्याने त्यांना नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात भरती केले. तेथे तीन दिवस उपचार करुनही तब्येतीत काहीच सुधारणा दिसली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना त्यांना पुढील उपचारासाठी हैद्राबाद येथे हलवले. परंतु, तेथेही तब्येतमध्ये सुधारणा झाली नसल्यामुळे त्यांना नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये १९ एप्रिल रोजी भरती केले.

हेही वाचा - भारतीयांसाठी ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान एकूण २१६ कोटी डोस उपलब्ध होतील.

संजय पतंगे यांची गंभीर झालेली तब्येत लक्षात घेऊन शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरु केले. रुग्णालयात भरती झाले तेव्हा त्यांचा सिटी स्कोअर हा २४ होता. त्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवावे लागले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने श्री. पतंगे यांच्या तब्येतीत सुधारणा होत गेली. १०- १२ दिवसात त्यांना आॅक्सीजनची गरज कमी लागत गेल्याने त्यांना दोन मे रोजी जनरल वार्डमध्ये हलवले. विशेष म्हणजे कोरोनात त्यांची दोन्ही फुफ्फुसे ग्रासलेले असतानाही योग्य उपचार झाल्यामुळे ते ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांना सहा मे २०२१ रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

या डॉक्टरांनी केले उपचार

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरीचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा श्वसनविकारशास्त्र विषयाचा ३० वर्षाचा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विजय कापसे, डॉ. भूरके, डॉ. कपील मोरे, डॉ. शितल राठोड, डॉ. उबेद खान, डॉ. संज्योत गिरी, डॉ. प्रशांत गजभारे, डॉ. संजीव झांगडे, डॉ. मनिषा बोलके यांच्यासह निवासी डॉक्टर डॉ. सुर्यकांत, डॉ. मनिषा, डॉ. जिशा, डॉ. शुभम, डॉ. फैजल यांनी योग्य उपचार केले आहेत.

‘‘डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. शासकीय रुग्णालय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पूर्ण क्षमतेने व जिद्दीने सामना करत आहे. आजपर्यंत असंख्य गंभीर रुग्णांवर योग्य उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त केले आहे.’’

- डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व महाविद्यालय, नांदेड.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसच्या उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT