sachkhand gurudwara 
नांदेड

Good News:गुरुद्वारा बोर्डाच्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा

प्रल्हाद कांबळे

नांदेड : महाराष्ट्रात शिख समाज अल्पसंख्यांक असूनही येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने चालविण्यात येणा-या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा दिला गेला नव्हता. या संदर्भात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. त्याचीच फलश्रुती म्हणून गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने चालविण्यात येणा-या सर्व शैक्षणिक संस्थांना शासनाने नुकताच अल्पसंख्यांक दर्जा दिला आहे. शासनाने याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.

येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा मिळावा अशी मागणी शिख समाज बांधवाच्या वतीने करण्यात येत होती. यासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुद्वारा बोर्डाच्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने खालसा माध्यमिक विद्यालय, खालसा प्राथमिक विद्यालय, सचखंड पब्लिक स्कूल व हजूर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदी शैक्षणिक संस्था चालविल्या जातात. या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शिख समाजाच्या वतीने मागणी करण्यात येत होती.  याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांचे लक्ष वेधले. शासनाकडे व अल्पसंख्यांक मंत्र्यांकडे पालकमंत्री चव्हाण यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुद्वारा बोर्डाच्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुद्वारा बोर्डाच्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा मिळाल्याने शैक्षणिक संस्थांत कर्मचारी भरती करताना बिंदु नियमावलीनुसार आरक्षणाची अटअसणार नाही. या समवेत अल्पसंख्यांक संस्था बाबतचाही लाभ मिळणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT