file photo
file photo 
नांदेड

Good News: दहावी, बारावी परीक्षेच्या वेळेत वाढ; सुधारित अंतिम वेळापत्रक, विशेष मार्गदर्शक सूचना निर्गमीत

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020- 21 मध्ये दहावी व बारावी लेखी परीक्षेतील पेपरची वेळ 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे व 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने एप्रिल-मे 2021 दहावी व बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात वेळेत बदल करुन सुधारित अंतिम वेळापत्रके मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

एप्रिल-मे 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकारी संकेतस्थळावर 26 फेब्रुवारी 2021 पासून उपलध करुन देण्यात आले होते.

लेखी, प्रात्यक्षिक व तत्सम परीक्षांना प्रविष्ठ होणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी कोविड-19 विषाणुच्या पार्श्वभुमीवर विशेष मार्गदर्शन सूचना मंडळामार्फत निश्चित करण्यात आलेल्या असून या सूचना मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. परीक्षार्थ्यांनी या विशेष मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शिक्षण राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT