file photo 
नांदेड

Good News:जेईई (मेन) परीक्षा मराठीसह होणार बहुभाषेत; विद्यार्थ्यांना देता येणार मातृभाषेतच परीक्षा

प्रमोद चौधरी

नांदेड : जेईई (मेन) २०२१ ही परीक्षा यावर्षीपासून इंग्रजी, हिंदी व मराठीसह इतर दहा प्रादेशिक भाषेमध्ये घेतली जाणार आहे. यासंदर्भात नॅशनल टेस्टांग एजन्सीच्या (एनटीए) वरिष्ठ संचालिका डॉ. साधना पाराशर यांनी शुक्रवारी (ता. आठ) परिपत्रक काढले आहे.

पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत परीक्षा होणार असल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आपआपल्या मातृभाषेत प्रश्नपत्रिका सोडवणे सोयीस्कर ठरणार आहे. प्रादेशिक भाषेत परीक्षा घेण्याचा हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने घेण्यात आलेला आहे. जेईई (मेन) परीक्षा मराठी, हिंदी व इंग्रजीसह आसामी, बंगाली, कानडी, मल्याळम, गुजराती, उडीसी, पंजाबी, तमिळ, तेलगु व उर्दु या प्रादेशिक भाषेतून घेतली जाणार आहे.

यावर्षीपासूनच जेईई (मेन) परीक्षा एकूण चार सत्रामध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षा फेब्रुवारी, मार्च,एप्रिल आणि मे या महिन्यात होणार आहे. सदरील परीक्षा २३, २४, २५, २६ फेब्रुवारी, १५, १६, १७, १८ मार्च, २७, २८, २९, ३० एप्रिल आणि २४, २५, २६, २७,२८ मे या तारखांना देशातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार असल्याचेही परिपत्रकामध्ये म्हटलेले आहे.

बी. आर्किटेक्ट या परीक्षेतील ड्रॉईंग टेस्ट वगळता इतर सगळ्या चाचण्या संगणकाधारीत असणार आहे. बहुपर्यायी, बहुसत्रीय परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेच्या अनेक संधी उपलब्ध होणार असून, त्यांना गुण सुधारण्यास मदतही होईल. शिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसानही होणार नाही. कोविड-१९ मुळे किंवा बोर्ड परीक्षा असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षेचा महिना निवडता येईल. विद्यार्थ्याना चार परीक्षा देणे बंधनकारक नसून, दिल्यास त्यापैकी एका परीक्षेतील मिळवलेले सर्वाधिक गुण विचारात घेवून गुणवत्ता यादी तयार केली जाईल, असेही डॉ. साधना पाराशर यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

नकारात्मक गुण नसणार

भारतातील विविध बोर्डाने अभ्यासक्रमाच्या बाबतीत घेतलेल्या विविध निर्णयाच्या अनुषंगाने सदरील परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत ९० प्रश्न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर विद्यार्थ्यांना कोणतेही ७५ प्रश्न सोडवण्याची मुभा राहील. प्रश्नपत्रिकेच्या भाग- ब (संख्यात्मक)मध्ये विद्यार्थ्यांना पर्याय दिले जातील व त्यासाठी कोणतेही नकारात्मक गुण असणार नाहीत.

विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल

जेईई (मेन) परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. सदरील संधी विद्यार्थी स्नेही असणार आहे. त्यामुळे गुणवत्ता वाढीस वाव असून विद्यार्थ्यांवरील परीक्षांचा ताण कमी करणारा हा निर्णय आहे.
- सुनील श्रीवास्तव, एनटीए शहर समन्वयक, नांदेड  

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway route villages : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांची यादी आली, असा आहे मार्ग

Maharashtra Education DA Arrears: शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ महागाई भत्ता थकबाकी मार्च २०२६ च्या वेतनासह देण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

Mumbai News : कुलगुरूंच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डीबाटू विद्यापीठाचे २०२५ मधील हिवाळी परीक्षांचे निकाल जाहीर

Gadchiroli Accident : अपघातात दांपत्याचा मृत्यू; सहा वर्षांची चिमुकली झाली पोरकी

SCROLL FOR NEXT