शासकिय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड 
नांदेड

Good News : नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला मिळणार नविन वसतीगृह

तीन मजली इमारत बांधकामासाठी 12 कोटी 67 लाख 93 हजार मंजूर, पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय वसतीगृहाची इमारत पाडून नवीन वसतीगृह बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यास यश आले. नवीन तीन मजली इमारत बांधकामासाठी 12 कोटी 67 लाख 93 हजार 837 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आता या महाविद्यालयातील तब्बल 100 विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय होणार आहे.

शहरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय परिसरात असलेल्या वसतीगृहाच्या जुन्या इमारतीत 16 खोल्या असून एका खोलीत तीन अशा 48 विद्यार्थ्यांचीच राहण्याची सोय उपलब्ध आहे. यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या अन्य विद्यार्थ्यांना शहरातील नातेवाईक अथवा अन्य ठिकाणी भाड्याने खोली घेऊन रहावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून वसतीगृहात निवासासाठी वाढीव विद्यार्थी संख्येची मागणी होती. सदर वसतीगृहाची इमारत अत्यंत जुनी आहे. शिवाय वसतीगृहात 100 विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय होणे आवश्यक असल्याचे वास्तव महाविद्यालयाच्या संबंधितांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

हेही वाचा - प्रिन्स मोहम्मद-बिन-सलमान यांनी उदारमतवादी धोरणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या मागणीची पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्यास यश आले असून शासकीय आयुर्वेद महाविद्यालय वसतिगृहाची इमारत पाडून नवीन वसतिगृह बांधकामासाठी 12 कोटी 67 लाख 93 हजार 837 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आता महाविद्यालयातील 48 ऐवजी तब्बल 100 विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय उपलब्ध होणार आहे. कांही दिवसांपूर्वीच नांदेडला स्टेट बँकेचे विभागीय कार्यालय, वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ कार्यालय, भोकर दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीसाठी दोन कोटी 14 लाख 86 हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याचे वृत्त ताजे असतानाच नवीन वसतिगृह बांधकामासाठी 12 कोटी 67 लाख 93 हजार 837 रुपये मंजूर करुन घेण्यात पालकमंत्री अशोक चव्हाण यांना यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT