file photo 
नांदेड

Good News : नांदेडची विद्यार्थीनी योगिता शाह हिची मंगळ ग्रह मोहिमेत गगनभरारी..

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील सर्वात जुनी शिक्षण संस्था असलेल्या आंध्र समिती हायस्कूलची माजी विद्यार्थिनी योगिता शाह ( पारेख ) यांनी नासाच्या मंगळ ग्रह मोहिमेत योगदान देऊन ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. योगिता ह्या शाळेच्या १९९१ च्या  बॅचमधून आपले दहावीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर औरंगाबाद येथील शासकीय इंजिनियरिंग कॉलेजातून इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केलं असून गेल्या चार वर्षापासून त्या नासाच्या मंगळ ग्रह मोहिमेत टीमसोबत योगदान देत असल्याचे त्यांनी भ्रमणध्वनीवरुन आंध्र समितीचे सहसचिव आय. जयराज यांच्याशी बोलताना सांगितले.

नासाच्या मंगळ ग्रह मोहिमेत त्यांनी अभूतपूर्व योगदान देणाऱ्या योगिता शाह ह्या नासाच्या मोहिमेत 'एवेयिक्स डोमेन लीड' या पदावर कार्यरत असून लहानपणापासून त्यांना अवकाश संशोधनात रुची होती. इंजिनीअर होण्याची प्रेरणा त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या ते नासाच्या जेट प्रोफेशन लॅबमध्ये कार्यरत आहेत.

नासाच्या मंगळ ग्रह मोहिमेत झालेल्या यशस्वी मोहिमेचा भाग झाल्याचा आनंद व्यक्त करताना त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. 
आंध्र समितीचे तत्कालीन शिक्षकवृंद दीक्षित, अंजुम, जोशी, पंडित, मुंगीकर आदी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शाळेतल्या ज्या मुलींना अवकाश संशोधन, अभियांत्रिकी, विज्ञान तंत्रज्ञानात आवड आहे अशा मुलींना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार असल्याची इच्छा त्यांनी भ्रमणध्वनीवरुन बोलताना व्यक्त केली. आंध्र समिती शाळेच्या एका माजी विद्यार्थिनींने नासाच्या टीममध्ये जाऊन आपले अमुल्य असे योगदान दिल्याबद्दल आम्हाला अपार आनंद वाटतो अशी भावना संस्थेचे अध्यक्ष जी. नागय्या, सचिव संजय तुला, शाळेचे चेअरमन डॉ. लक्ष्मणाचारी व कार्यकारी समिती संचालकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT