file photo
file photo 
नांदेड

मांसाहरीसाठी गुड न्यूज : अत्यावश्यक सेवांमध्ये चिकण, मटण, अंडी व मासे दुकानांचा अंतर्भाव

प्रल्हाद कांबळे

नांदेड : महाराष्ट्र शासनाने कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव खंडीत करण्यासाठी (ब्रेक द चेन) अभियानातर्गंत दिलेल्या आदेशामध्ये आणखी काही बाबीचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. यात पशुसंवर्धन विभागाशी निगडीत खालील बाबी अंर्तभूत आहेत.

1. अत्यावश्यक सेवामध्ये दुध व दुग्धजन्य पदार्थ (डेअरी) आणि फुडशॉपचा समावेश करण्यात आला आहे. यात चिकन, कोंबडया, मटण, अंडी, मासे दुकानाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. जनावरांसाठी आवश्यक असणारे पशु/कुकुट खाद्य, चारा आदिचाही समावेश केला आहे.

2. हवामान व मान्सून पुर्व उपक्रमाच्या व्यवस्थापनेच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी व्यापक प्रमाणात जनावरांचे मान्सून पुर्व लसीकरण केले जाते. या उपक्रमाला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे.

3. जनसामान्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाचा समावेश केला आहे.

4. माल वाहतूक सेवेमध्ये वाहतूक व पुरवठा शृंखला सुरु ठेवण्यात आली असून यात दुध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे व जनावरांचा चारा या वस्तु व त्यांचेवर प्रक्रीया करण्यासाठी लागणाऱ्या कच्या मालाची वाहतूक व त्यांच्या साठवणुकीसाठी गोदामे चालविणे याबाबींचा अत्यावश्यक सेवेत अंतर्भाव होतो.

5. सर्व प्रकारचे उत्पादन उद्योग सुरु ठेवण्यात आले आहे. यात अन्न प्रक्रीया , डेअरी, पशुखाद्य व चारा प्रक्रीया, औषध निर्मिती, लस निर्मिंती, वैद्यकीय उपकरणे निर्मिंती तसेच या सर्वांना सहाय्यभूत ठरतील अशा सेवा, त्यांची वाहतूक आणि त्यांचे विक्रेते व त्यांच्या सेवा समाविष्ठ केल्या आहेत.

या सेवा उपलब्ध करीत असताना संबंधितानी शासनाद्वारे तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

SCROLL FOR NEXT