file photo
file photo 
नांदेड

गुड न्यूज : बांबू लागवडीसंदर्भात पाशा पटेल यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन 

प्रल्हाद कांबळे

नांदेड- शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष ठरणाऱ्या बांबू या पिकाची लागवड आणि त्यातून होणारे फायदे यासंदर्भात माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार पाशा पटेल यांच्या उपस्थितीत ता. नऊ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता नांदेड तालुक्यातील निळा येथे बांबू मिशन शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

पाशा पटेल हे पर्यावरण अभ्यासक आहेत. राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. स्वतः बांबू लागवड करतानाच मराठवाड्यात त्यांनी बांबू लागवडीची चळवळ उभारली आहे. या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याच्या माध्यमातून त्यांचे बांबू लागवडी संदर्भातील विचार आणि फायदे जाणून घेता येणार आहेत. खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असलेल्या बांबू मिशन मार्गदर्शन शिबिरास जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. सुनिल कदम, प्रगतिशील शेतकरी म्हणून चैतन्यबापू देशमुख, डॉ. श्याम तेलंग, बालाजी जाधव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.

बांबू लागवड केली असता वर्षाकाठी एक एकरमध्ये किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवणे शक्य आहे. बांबूपासून इथेनॉल, सीएनजी, कापड,फर्निचर, कागद, तांदूळ, बिस्किट, लोणची यासारख्या विविध वस्तू तयार होत आहेत. बांधकामांमध्ये लोखंडी सळीसोबत १५ टक्के बांबू वापरण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मोदी सरकारने सीएनजीचे पाच हजार पंप काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांबू हा शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष ठरणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक भगवानराव अलेगांवकर, संदीप डाकूलगे, सतिश कुलकर्णी, पंढरीनाथ बोकारे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात मतदाराने चक्क ईव्हीएम पेटवली; तरुण पोलिसांच्या ताब्यात

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT