अर्धापूर (जिल्हा नांदेड) येथे पालावर राहणाऱ्यांना मदत
अर्धापूर (जिल्हा नांदेड) येथे पालावर राहणाऱ्यांना मदत 
नांदेड

विधायक बातमी : पालावरच्या 650 कुटुंबातील महिलांचे चेहरे खुलले

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सामाजिक कार्यात सदैव तत्पर असलेले व भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते सुनील डोईजड यांच्या पुढाकारामुळे अर्धापूर तालुक्यातील पालावरच्या ( वैदु समाज ) जवळपास 650 कुटुंबाना शर्ट, पॅन्ट व साडींचे वाटप करण्यात आले. ऐन संकटात असलेल्या या कुटुंबांना या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

सुनील डोईजड यांचे समाज प्रबोधन, सामाजिक चळवळीत मोठे योगदान आहे. रक्तदान, रस्त तपासणी, अँटीजेन तपासणी, आरटीपीसीआरची मोफत टेस्ट आदी उपक्रम राबवून त्यांनी समाजसेवा केलेली आहे. तसेच लॉकडाऊन काळात अन्नधान्यांच्या कीट वाटप करून त्यांनी भटक्या समाजाचे दुःख वाटून घेतले आहे.

हेही वाचा - दीड वर्षापासून ‘फोकस’ बदलून सेवाकार्यावर : प्रा. प्रशांत साठे

अर्धापूर शहरात विविध भागात पालं टाकून राहणा-या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या 650 च्यावर कुटुंबांना सुनील डोईजड यांनी आशीर्वाद कपडा बँकेच्या माध्यमातून कपडेरुपी साडी, पँट, व शर्टचे मोफत वाटप केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रोहीणी सुनील लढ्ढा, रेणुका गिरीश बाल्दी, सुनयना भूषण डागा, पुनम योगेश बियाणी, विधी कचरुसेठ बजाज, योगेश बियाणी, माजी नगरसेवक विश्वास कदम, व्यंकटी राऊत, सतीश गोविंदवार, गोविंद वट्टमवार, शैलेश मुखेडकर, वासुदेव समाजाचे गणेश चव्हाण, प्रा. भास्कर थिटे पाटील, मनीष जाधव, बांधकाम व्यावसायिक कचरु बजाज, आशीष बियाणी, गणेश जाजू, प्रशांत क-हाळे, शरद मांगीलवार, अॅड. प्रसाद राणळकर, गुलजार ठाकूर, भटक्या विमुक्त समाजचे नारायण बाबर, साईनाथ शिंदे व भावराव शितोळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Chitta Ranjan Das: आज मला खरं सांगायला हवं... निवृत्तीच्या दिवशी RSS बद्दल न्यायमूर्ती असे का म्हणाले?

Sambit Patra: 'भाजप नेते मोदींना देवाच्या वरती समजू लागले'; संबित पात्रांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा

Raghuram Rajan: 'भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल पण...', RBIचे माजी गव्हर्नर यांनी व्यक्त केली चिंता

Gold Rate: सोने-चांदी तोडणार सर्व रिकॉर्ड? इराण ठरणार कारणीभूत; जाणून घ्या भाव

Latest Marathi News Live Update: गजानन महाराजांच्या पालखीलचे 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान

SCROLL FOR NEXT