file photo 
नांदेड

चांगली बातमी : प्रवाशांच्या सोयीकरिता आणखी तीन विशेष गाड्या, दमरेचा निर्णय  

प्रल्हाद कांबळे

नांदेड : प्रवाशांच्या सुविधेकरिता दक्षिण मध्य रेल्वे डिसेंबर माहिन्यात हुजूर साहिब नांदेड–श्रीगंगानगर- हुजूर साहिब नांदेड  दरम्यान दोन विशेष गाड्या आणि सिकंदराबाद- जयपूर- सिकंदराबाद दरम्यान एक गाडी अशा तीन विशेष गाड्या सुरु करत आहे. 

या तिन्ही विशेष रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. 

या गाडीच्या वेळा पुढील प्रमाणे असतील 

  • १ गाडी संख्या ०२४३९ हु. सा. नांदेड ते श्रीगंगानगर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस २७ डिसेंबर, २०२०  ते ३१ जानेवारी २०२१  दरम्यान दर रविवारी सकाळी  ११. ०५ वाजता हुजूर साहिब नांदेड येथून सुटेल आणि हिंगोली, वाशीम, अकोला, नवी दिल्ली, भटिंडा, हनुमानगढ मार्गे रात्री २०.१५  वाजता श्रीगंगानगर येथे पोहोचेल.
  • २. गाडी संख्या  ०२४४० श्रीगंगानगर  ते हु. सा. नांदेड साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ता. २५ डिसेंबर, २०२० ते २९ जानेवारी, २०२१ दरम्यान दर शुक्रवारी दुपारी १३. २५ वाजता श्रीगंगानगर येथून सुटेल आणि हनुमानगढ, भटिंडा, नवी दिल्ली, अकोला, वाशीम, हिंगोली मार्गे रात्री २१. ४० वाजता हुजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल. 
  • ३. गाडी संख्या ०२४८५ हु. सा. नांदेड ते श्रीगंगानगर विशेष द्विसाप्ताहिक एक्सप्रेस ता. २४ डिसेंबर, २०२०  ते ०१ फेब्रुवारी २०२१  दरम्यान दर सोमवारी आणि गुरुवारी सकाळी ११. ०५ वाजता हुजूर साहिब नांदेड येथून सुटेल आणि हिंगोली, वाशीम, अकोला, नवी दिल्ली, भटिंडा मार्गे रात्री १९. ०० वाजता श्रीगंगानगर येथे पोहोचेल. 
  • ४. गाडी संख्या ०२४८६ श्रीगंगानगर  ते हु. सा. नांदेड द्विसाप्ताहिक विशेष एक्सप्रेस ता. २२  डिसेंबर, २०२० ते ३०  जानेवारी, २०२१ दरम्यान दर  मंगळवार आणि शनिवारी दुपारी १४.४५  वाजता श्रीगंगानगर येथून सुटेल आणि भटिंडा, नवी दिल्ली, अकोला, वाशीम, हिंगोली मार्गे रात्री २१.४०  वाजता नांदेड येथे  पोहोचेल
  • ५. गाडी संख्या  ०९७१४ सिकंदराबाद ते जयपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २८ डिसेंबर २०२० ते ०१ फेब्रुवारी २०२१ दरम्यान दर सोमवारी सिकंदराबाद येथून रात्री २१. ४० वाजता सुटेल आणि नांदेड, हिंगोली, अकोला, भोपाल, उज्जैन, कोटामार्गे जयपूर येथे सकाळी ०६. ४५ वाजता पोहोचेल.
  • ६ गाडी संख्या ०९७१३ जयपूर ते सिकंदराबाद साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ता. २६ डिसेंबर २०२० ते ३० जानेवारी २०२१  दरम्यान दर शनिवारी जयपूर येथून रात्री २२. ३५ वाजता सुटेल आणि कोटा, उज्जैन, भोपाल, अकोला, हिंगोली, नांदेड मार्गे सिकंदराबाद येथे सकाळी ०६. ५० वाजता पोहोचेल.  

 
प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य  सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT