file photo 
नांदेड

रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी; दमरेच्या पुन्हा दोन नवीन गाड्या सुरु होणार 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : रेल्वे बोर्डाने घोषित केल्यानुसार दोन नवीन रेल्वे गाड्या सुरु होणार आहेत, कोल्हापूर- नागपूर- कोल्हापूर आणि तिरुपती- श्री साईनगर शिर्डी-तिरुपती या गाड्या नांदेड रेल्वे विभागातून धावणार आहेत.

गाडी संख्या 07417  तिरुपती- श्री साई नगर शिर्डी (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर मंगळवारी : ही गाडी ता. सहा एप्रिलपासून तिरुपती येथून दर मंगळवारी सकाळी 08. 30 वाजता सुटेल आणि गुंटकळ, सिकंदराबाद, निझामाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे श्री साईनगर शिर्डी  येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10. 45 वाजता पोहोचतील. 

गाडी संख्या 07418  श्री साईनगर शिर्डी- तिरुपती- (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर बुधवारी :  ही गाडी ता. सात एप्रिलपासून श्री साईनगर शिर्डी येथून दर बुधवारी रात्री 19. 35 वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, नांदेड, निझामाबाद, सिकंदराबाद, गुंटकळ मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी रात्री 22.10 वाजता तिरुपती येथे पोहोचतील. 

गाडी संख्या 01404 कोल्हापूर ते नागपूर  (द्वी- साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर सोमवारी आणि शुक्रवारी : ही गाडी ता. 12 मार्च, 2021 पासून कोल्हापूर येथून दर सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी 12. 45 वाजता सुटेल आणि मिरज, लातूर, परभणी, वाशीम, अकोला मार्गे नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता पोहोचेल.  

गाडी संख्या 01403 नागपूर ते कोल्हापूर (द्वी- साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर मंगळवारी आणि शनिवारी : ही गाडी ता. 13  मार्च, 2021 पासून नागपूर येथून दर मंगवारी आणि शनिवारी दुपारी 15.15 वाजता सुटेल आणि मिरज, लातूर, परभणी, वाशीम, अकोला मार्गे कोल्हापूर  येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 14 वाजता पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games : स्क्वॅशमध्ये दोन सुवर्णपदकं हुकली! अनाहत-अभय यांना रौप्य, तर बॉक्सिंगमध्ये दोन मेडल्स पक्के

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ohh No! भारतीय गोलंदाज जखमी, स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; असं नेमके काय घडले?

मनीष मल्होत्रांच्या रॅम्पवर सेलिब्रिटींचा जलवा! सगळीकडे आलियाच्या साडीची चर्चा, लूक पाहून चाहते घायाळ

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT