file photo 
नांदेड

विधायक बातमी : स्व:खर्चाने भागविली गावकऱ्यांची तहाण; ग्रामपंचायत सदस्याचे कौतुक

विठ्ठल लिंगपूजे

शिवणी (ता. किनवट, जिल्हा नांदेड) : किनवट तालुक्यातील शिवणी हा परिसर दरवर्षी उन्हाळ्याच्या झळा सहन करतो. या ठिकाणच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परंतु आपल्या गावकऱ्यांची ही अवस्था पाहून ग्रामपंचायत सदस्य संग्राम बिरकुले गहिवरले. एवढेच नाही तर आपल्या आई- भगिनीच्या डोक्यावरील त्यांनी हंडा उतरविला. स्वखर्चाने त्यांनी शिवणी गावात पाण्याची सोय करुन गावकऱ्यांची खऱ्या अर्थाने तहाण भागविली. त्यांच्या या विधायक कामाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

किनवट तालूक्यातील शिवनी येथे दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होत असते. उन्हाळ्यात सार्वजनीक नळयोजने अंतर्गत शिवणी येथे दर दोन दिवसानी नागरीकांना नळाचे पाणी मिळत असून सध्या उन्हाळ्याचे दोनच महीने शिल्लक असुन शिवणी येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रापंचायतच्या प्रभाग दोन मधील महिलांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत होते. शिवणी येथिल नागरीकांचा मोठ्याप्रमाणात शेतीचा व्यवसाय असल्याने पावसाळा दोनच महीण्यावर येउन ठेपल्याने शेतीचे कामे करावी लागत आहेत. 

प्रत्येक घरातील एका व्यक्तीला पाण्यासाठी घरीच रहावे लागत असल्याने शेतीचे कामे कमी प्रमाणात होत आहेत. तसेच रोजंदारीची कामे करणारे आता उन्हाळ्यात जंगलातील मोहफुले, तेंदु पत्ता गोळा करण्याठी सकाळी जातात. त्यासाठी त्याना रात्रीलाच पाण्याची सोय करुन ठेवावी लागते. शिवनी येथिल नव्याने ग्रामपंचायतची नुकतीच निवडनणूक झाली. या निवनुकीत प्रभाग दोनमधुन संग्राम बिरकुले यांचा विजय झाला. नागरीकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे त्यानी प्रभाग दोनमधील झालेल्या पाणी टंचाईची बाब लक्षात आल्याने त्यानी स्वखर्चाने जवळपास एक लाख रुपये खर्च करुन प्रभागात दोन बोअर मारले. त्या बोअरवेलला पाणीही लागल्याने प्रभागातील महिला समाधान व्यक्त करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Police Bribery : लाचखोर पोलिसाला एसपी दोशींचा मोठा दणका; न्यायालयीन कोठडी मिळवून देण्यासाठी मागितलेली 5 हजारांची लाच, हवालदाराला कसं रंगेहाथ पकडलं?

CSK: चेन्नई सुपर किंग्स IPL 2026 च्या प्ले ऑफमध्ये का नाही पोहोचली? दिग्गज खेळाडूने सांगितली ४ मोठ कारणं

Pune Crime News : "साहेब आम्हाला गोळ्या घाला पण मुलगी शोधून द्या!" पुण्यात पालकांचा पोलीस स्टेशनसमोर आक्रोश, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : गोळीबार प्रकरणी आंदेकर टोळीतील पाचजणांना २७ मेपर्यंत पोलिस कोठडी

Ganga River: गंगेच्या अखेरच्या टप्प्यात प्रदूषणात मोठी घट; सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमुळे सुधारणा, बहुतांश भाग आता स्नानासाठी योग्य

SCROLL FOR NEXT