नांदेड : महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाचा ३३ वा गुणवंत कामगार पुरस्कार सोहळा नुकताच महाराष्ट्र कामगार कल्याण मध्यवर्ती कार्यालय हुतात्मा बाबू गेणू गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी मुंबई येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, कामगार प्रधान सचिव विनिता वेद- सिंघल, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कल्याण आयुक्त रवीराज इळवे व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा - विधायक बातमी : एचआयव्ही संक्रमित अनाथांचा सामूहिक विवाह सोहळा; परभणीच्या एचएआरसी संस्थेने पालकत्व स्विकारले
यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार येथील यांत्रिकी कर्मचारी तथा (आर्टसी मेकॅनिक) या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी गुणवंत मिसलवाड यांना मागीलवर्षी जाहीर झालेला कामगार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जााणरा गुणवंत कामगार पुरस्कार वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम पंचवीस हजार रुपये स्मृतीचिन्ह, मानपत्र देऊन सत्कार करुन गौरविण्यात आले. गुणवंत मिसलवाड हे मूळचे कबिरवाडी (ता. देगलूर) येथील रहिवाशी असून विद्यार्थी दशेपासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड असून तीन दशकापासून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, संघटन कौशल्य आदी क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शासनाने या कार्याची दखल घेऊन गुणवंत कामगार पुरस्कार बहाल करुन भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.