file photo 
नांदेड

पदवीधर निवडणूक : मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी- डॉ. विपीन इटनकर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : निवडणूकाबाबतचे प्रशिक्षण हे आपली जबाबदारी व कर्तव्य अचूक पार पाडता यावीत यासाठी असतात. नेहमीच्या निवडणूकापेक्षा औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी असलेली निवडणूक ही  बॅलेट बॉक्‍सचा वापर करुन होत असून मतदान केंद्रावर गोंधळ गडबड होणार नाही याची दक्षता घ्यावी असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी केले. शंकरराव चव्‍हाण सभागृह येथे नुकतेच पदवीधर मतदान प्रक्रीयाबाबतचे दुसरे प्रशिक्षण संपन्‍न झाले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी पदवीधर मतदारसंघ निवडणुकचे पालक तथा समन्‍वयक आर. एस. अहीरे, अपर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहाय्यक जिल्‍हाधिकारी किर्तीकुमार पुजारा, निवडणूक उपजिल्‍हाधिकारी प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार किरण अंबेकर, नायब तहसिलदार सारंग चव्‍हाण, उर्मीला कुलकर्णी उपस्थित होते.

दुसऱ्या प्रशिक्षणाचे वैशिष्‍टये म्‍हणजे निवडणुक प्रशिक्षणासाठी प्रत्‍यक्ष व्‍यासपिठावर मतदान कक्ष तयार करुन तहसिलदार किरण अंबेकर यांनी अत्‍यंत अभ्‍यासपुर्ण पध्‍दतीने प्रशिक्षण दिले. यामध्‍ये मतदान केंद्रात मतदार आल्‍यापासुन मतदान करुन जाईपर्यंत कोणकोणत्‍या बाबी करणे आवश्‍यक आहे. याची बारकाईने माहिती देण्‍यात आली. या प्रसंगी प्रशिक्षण घेणाऱ्यांनी विविध प्रश्‍न विचारले याचे समर्पक व योग्‍य उत्‍तरे किरण अंबेकर यांनी देऊन शंकेचे पुर्ण निरसन केले .

प्रथमच अशा नाविन्‍यपुर्ण पध्‍दतीचा वापर केल्‍यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्यांनी समाधान व्‍यक्त केले व जिल्‍हाप्रशासनाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नायब त‍हसिलदार मुगाजी काकडे यांनी केले तर आभार सारंग चव्‍हाण यांनी व्‍यक्त केले. हे प्रशिक्षण यशस्‍वी करण्‍यासाठी कुणाल जगताप, शोभा माळवतकर , कविता जोशी, दशरथ आडेराघु, जि.आर. शिवरात्री, राजेश कुलकर्णी, हणमंत जाधव व स‍य्यद युसुफ यांनी सहकार्य केले .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsath Video: पैशाने भरलेली बॅग अन् हातात ग्लास घेऊन बेडवर बसले; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bitcoin All Time High: बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक; एका बिटकॉइनसाठी किती रुपये द्यावे लागणार?

Crime News : मुलांना जेवणातून द्यायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकर यायचा अन्..., बीनाने अडथळा ठरणाऱ्या पतीचा 'असा' काढला काटा

Artificial Intelligence: 'जमीन, जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आता ‘एआय’चा वापर'; विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी ‘महसूल’चे सर्वेक्षण

Donald Trump: मित्रप्रेमासाठी ब्राझीलला आयातशुल्काचा दणका; ट्रम्प यांचा निर्णय, माजी अध्यक्ष बोल्सेनारोंवरील कारवाई अमान्य

SCROLL FOR NEXT