The Gram Panchayat in Borgaon Telang has finally gone unopposed 
नांदेड

Gram Panchayat Election : बोरगांव (तेलंग) येथील ग्रामपंचायत अखेर बिनविरोध

प्रल्हाद कांबळे

नांदेड : तालुक्यातील बोरगांव (तेलंग) येथील ग्रामपंचायत निवडणूक अखेर बिनविरोध करण्यात तेथील गांव पुढाऱ्यांना यश आले आहे. कोविड - १९  महामारीच्या काळात राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूक घोषित झालेल्या गावात गट तट, रुसवे फूगवे, वाद विवाद असे प्रकार प्रामुख्याने पहावयास मिळत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत भाव भावकी, सगे सोयरे, आप्त मित्र देखील एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून तयारीत असतात. काही ठिकाणी तर निवडणुकीच्या कारणांमुळे वादविवाद टोकापर्यंत पोहोचतात म्हणून वरील प्रकार थांबावेत व गावामध्ये सलोखा कायम राहावा, या उद्देशाने बोरगांव येथील क्षीरसागर, कंधारे, निवडंगे व पुरी अशा निर्णायक मतदार असलेल्या प्रमुख कुटुंबियांनी सर्वच ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

सोमवारी सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये सर्व सात सदस्य बिनविरोध निवडून आणले आहेत. राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनेच्या धर्तीवर बोलबाला असलेल्या आमदार, खासदार निधीतून विशेष बक्षीस मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या या गावास आमदार आणि खासदार निधीतून भरीव निधी मिळणार असल्याचे बोलल्या जात असून काही ठिकाणी तर बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी ५० लाखापर्यंत विशेष निधीची घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. ई- स्वराज ॲपच्या माध्यमातून गावामध्ये झालेल्या खर्चाचा तपशील पाहणे सहज शक्य होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना देखील गावातील विकास आराखडा पाहणे सोयीचे झाले आहे.

येथील निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे तेथील नागरिकांचे कौतुक करण्यात येत असून नवनिर्वाचित विजयी सदस्यांचे अभिनंदन होत आहे. निवडून आलेले सदस्य अनिल शिवाजीराव क्षीरसागर (खुला प्रवर्ग), राजू विश्वनाथ कंधारे (अ.जा.), केशवराव क्षीरसागर (खुला प्रवर्ग), वच्छलाबाई जळबाजी निवडंगे (अ.जा.), गिरजाबाई बालाजी क्षीरसागर (खुला प्रवर्ग महिला), लक्ष्मीबाई नागेंद्रबुवा पूरी (इतर मागास), कलावतीबाई रतनबुवा पूरी (इतर मागास प्रवर्ग) आदींचा समावेश आहे. बिनविरोध निवडणूक होण्यासाठी आनंदा पाटील क्षीरसागर, कोंडिबा निवडंगे, नारायण कंधारे, माधव कंधारे, शिवाजी पाटील क्षीरसागर, रतनबुवा पूरी, गंगाधर कंधारे, नागोराव निवडंगे आदींनी यशस्वी प्रयत्न केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT