File photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर हरभरा पेरणी 

प्रमोद चौधरी

नांदेड : यंदाचा समाधानकारक पाऊस आणि प्रकल्पात असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ९२ हजार १८० हेक्टरनुसार १३७.०५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात हरभऱ्याची पेरणी एक लाख ५४ हजार १९ हेक्टरवर झाल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली. 

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान भरुन निघावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी रब्बी पिकाखालील क्षेत्र या वर्षी तीन लाख हेक्टरवर वाढविण्यासाठी नियोजन केले होते. कृषी विभागाने रब्बीसाठी लागणाऱ्या बियाणे तसेच खताचे नियोजन केले होते. जिल्ह्याचे रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र एक लाख ४० हजार हेक्टर एवढे आहे. तर यात हरभरा पिकाचे सरासरी पेरणी क्षेत्र ८८ हजार हेक्टर आहे. आजपर्यंत सरासरीच्या १३७ टक्केनुसार एक लाख ९२ हजार १८० हेक्‍टरवर रब्बीमध्ये पेरणी झाली आहे. 

यात सर्वाधिक एक लाख ५४ हजार १९ हेक्टरवर हरभरा पेरला आहे. यासोबतच रब्बी ज्वारी २१ हजार ४०६ हेक्टर, गहू ११ हजार ४६१ हेक्टर, रब्बी मका एक हजार ५७६, करडई दोन हजार ३२१, रब्बी तीळ सहा, जवस नऊ हेक्टरवर झाल्याची माहिती रविशंकर चलवदे यांनी दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून जास्तीत जास्त क्षेत्रावर रब्बी पिकाची पेरणी करावी तसेच उन्हाळी हंगामात उन्हाळी ज्वारी भुईमूग या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करावी असे आवाहन रविशंकर चलवदे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 

रब्बी पिकांच्या क्षेत्रात होतेय वाढ 
सध्या जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यालगतच्या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी उपलब्ध होत असल्याने रब्बी पिकांसह बागायती पिकांच्या क्षेत्रात वाढ होत आहे. 
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT