accident news sakal
नांदेड

नांदेड : नातवाचा अपघात; धक्क्याने आजीची मृत्यू

मांडवी येथील घटना, दुचाकीच्या धडकेत एक ठार

सकाळ वृत्तसेवा

मांडवी (जि. नांदेड) : मांडवी ते पाटोदा (बुद्रुक) रस्त्यावर दोन दुचाकींचा अपघात झाला. यात एक युवक ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला, अशी चुकीची माहिती मिळाल्याने त्याच्या आजीचा धक्क्यामुळे मृत्यू झाला.

शिवजयंतीचे सामान खरेदीसाठी विवेक गणपत सोनुले (वय २०), अनिकेत रवी रेणके (वय १९ रा. पाटोदा बु. ता. किनवट) हे पाटोद्यावरून मांडवीकडे दुचाकीवरून जात होते तर आशना कुंटलवार (वय ४६) आणि लक्ष्मण धर्मा कुमरे (वय ३९, रा. लिंगी, ता. किनवट) हे दुचाकीने (टीएस-०१, ईए-२०३६) मांडवीहून लिंगीकडे जात होते.

दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात चारही जण जखमी झाले. यात विवेक सोनुले व अनिकेत रेणके हे गंभीर असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. विक्रम राठोड यांनी प्राथमिक उपचार करून आदिलाबाद येथे उपचारासाठी संदर्भित केले. सोनुलेला आदिलाबादवरून नागपूर येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेतील गंभीर जखमी अनिकेत रेणके याच्या मृत्यूची अफवा गावात पसरताच त्याची आजी छबूबाई शंकर रेणके यांना मोठा मानसिक धक्का बसला. यातच त्यांचा मृत्यू झाला. साईनाथ गंगाधर सोनुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशना कुंटलवार यांच्याविरुद्ध मांडवी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

SCROLL FOR NEXT